
Yoga Success Story: दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगाच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धांमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकजण सहभागी होतात. पण जर इरादे मजबूत असतील तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते. आज आपण या लेखाच्या माध्यमातून अशाच एका ध्येयवादी आणि योगा शिकण्याची आस बाळगलेल्या प्रितीची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत. तिची योगा शिकण्याची धडपड, चिकाटी आणि प्रेरणा किती कणखर होती हे यामधुून समजून घेणार आहोत. आजच्या ऑनलाईनच्या जमान्यात सोशल मीडियाचा सर्हासपणे गैरवापर होत असतानाच तिने त्याच सोशल मीडियाचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी केला.
पलामू जिल्ह्यातील 17 वर्षीय प्रीती कुमारी जिने युट्यूबवरुन योगा शिकून राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. प्रीतीने "खेलो झारखंड" अंतर्गत राजधानी रांची येथे झालेल्या राज्यस्तरीय एसजीएफआय स्पर्धेत 19 वर्षांखालील गटात भाग घेऊन आणि तिच्या योगा (Yoga) कौशल्याने सर्वांना प्रभावित केले. या कामगिरीनंतर तिची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली.
प्रीती कुमारी सांगते, ती युट्यूब पाहून योगा शिकली. यासाठी मला माझा मोठा भाऊ सुमित गिरीकडून प्रेरणा मिळाली, जो स्वतः योगा स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा. सुरुवातीला भावाने मला काही बेसिक योगासने शिकवली, परंतु कोणताही प्रशिक्षक न मिळाल्याने मी सोशल मीडिया आणि युट्यूबची मदत घेतली. मी ऑनलाइन व्हिडिओ पाहून पद्मासन, वज्रासन, शीर्षासन आणि धनुरासन यासारख्या आव्हानात्मक आसनांमध्ये प्रभुत्व मिळवले.
प्रीतीने चार वर्षांपूर्वी योगाभ्यास सुरु केला आणि आतापर्यंत दोन राज्य आणि दोन जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये पदके जिंकली. तिचे पुढील ध्येय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणे आणि भविष्यात आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे (India) प्रतिनिधित्व करणे आहे. प्रीती सांगते, अभ्यासासोबतच ती दररोज दोन तास योगाभ्यास करते.
प्रीतीचे वडील लष्करातून निवृत्त झालेले आलोक गिरी आणि गृहिणी असलेल्या तिच्या आई सुषमा देवी यांनी नेहमीच तिला पाठिंबा दिला. प्रितीच्या मते, तिच्या कुटुंबाचा पाठिंबा हा तिच्या यशाचा मुख्य आधार आहे. तिचे आजी-आजोबा, काका-काकू सर्वांना तिच्या विजयाचा अभिमान वाटला आणि त्यांनी आनंद व्यक्त केला.
प्रिती सांगते, योग हा केवळ एक गेम नाही तर तो शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. योग केल्याने केवळ ताणच कमी होत नाही तर शरीर पूर्णपणे निरोगी आणि बलवान होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.