Yoga & Ayurveda Benefits: 'हृदयविकार अन् स्ट्रोक' बरे करणार योग अन् आयुर्वेद? संशोधनातून खुलासा

AIIMS CIMR Research On Yoga: हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मायग्रेन, मधुमेह आणि झोपेच्या समस्या यासारख्या आजारांवर योग आणि आयुर्वेदाचे सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.
Yoga & Ayurveda Benefits
Yoga & Ayurveda BenefitsDainik Gomantak
Published on
Updated on

AIIMS CIMR Research Confirms Yoga & Ayurveda Benefits for Chronic Diseases

आजच्या धावपळीच्या युगात शरीर निरोगी ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे. निरोगी शरीरासाठी लोक नवनवीन पद्धती अवलंबत आहेत. यामध्ये योगासने, योग्य खाण्याच्या सवयी आणि आयुर्वेदिक उपचारांचा समावेश करत असल्याचे दिसून येत आहेत. याचदरम्यान एम्सच्या सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह मेडिसिन रिसर्च (CIMR) मध्ये केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, योग आणि आयुर्वेद अनेक गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरु शकतात. हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, मायग्रेन, मधुमेह आणि झोपेच्या समस्या यासारख्या आजारांवर योग आणि आयुर्वेदाचे सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.

जीवनशैली बदलण्याचा मार्ग

डॉ. गौतम शर्मा यांनी सांगितले की, योग हा केवळ व्यायाम नाही तर जीवनशैली बदलण्याचा एक मार्ग आहे. योग्य योगासने आणि प्राणायमामुळे अनेक जुनाट आजार बरे होऊ शकतात. संशोधनात असेही आढळून आले की, प्रत्येक आजारासाठी वेगवेगळ्या योग तंत्रांची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी काही योगासन हानिकारक असू शकतात. म्हणून योग्य योगासने करणे आवश्यक आहे. त्याचवेळी, प्राणायाम आणि ध्यानधारणेमुळे निद्रानाशाच्या समस्येत प्रचंड सुधारणा होते.

Yoga & Ayurveda Benefits
Ayurveda Health Tips: 'काळमेघ' या औषधी वनस्पतीचे आरोग्यदायी फायदे

योगामुळे मज्जासंस्था मजबूत होते

संशोधनानुसार, योगाचा आपल्या शरीराच्या मज्जासंस्थेवर थेट परिणाम होतो. ही मज्जासंस्था हृदयाचे ठोके, पचन आणि ताण नियंत्रित करते. योग आणि प्राणायाममुळे या प्रणालीची कार्यक्षमता वाढते आणि व्यक्तीला अधिक निरोगी वाटते.

Yoga & Ayurveda Benefits
Heart Attack Prevention Tips: हृदयविकार टाळण्यासाठी आहारात काय बदल करावे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

रोगांना मूळापासून नष्ट करण्यासाठी योग प्रभावी

संशोधनाच्या निष्कर्षातून समोर आले की, गंभीर आजारांच्या उपचारांमध्ये योग आणि आयुर्वेदिक उपचारांचा समावेश केला पाहिजे. आधुनिक औषधांना मर्यादा आहेत, परंतु योग आणि आयुर्वेद रोगाच्या मुळाशी पोहोचतात. प्रत्येक व्यक्तीने योग आणि आयुर्वेदाशी जोडले पाहिजे कारण ते कोणत्याही दुष्परिणामांशिवाय शरीर निरोगी ठेवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com