पराभवानंतर गांधी घराण्यावर प्रश्नचिन्ह! चिदंबरम म्हणाले - पक्षाचा प्रत्येकजण जबाबदार...

हे सत्य आहे की, 5 राज्यांच्या निवडणुकीत आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पण याचा अर्थ असा नाही की पक्ष विचार न करता निर्णय घेणार
P. Chidambaram
P. ChidambaramDainik Gomantak
Published on
Updated on

पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाल्यानंतर सध्या पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. काँग्रेस पक्ष नियमित बैठका घेऊन पराभवाच्या कारणांचा आढावा घेत आहे. यावर नुकतीच काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) बैठकही झाली. बैठकीत पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यादरम्यान सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी हंगामी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचीही ऑफर दिली होती, पण ती फेटाळण्यात आली होती.

या सर्व जल्लोषात आता गांधी घराण्यालाही पराभवाचे टार्गेट केले जात आहे. या मुद्द्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी माध्यमांशी खास बातचीत केली. या संवादात त्यांनी निवडणुकीतील (Assembly Election) पराभवासाठी कोणत्याही एका व्यक्तीला जबाबदार धरण्यास विरोध केला. पराभवाला सगळेच जबाबदार असल्याचे ते म्हणाले.

पी. चिदंबरम म्हणाले की, काँग्रेसला अशा पराभवाला सामोरे जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. मला अजूनही 1977 चा काळ आठवतो, जेव्हा काँग्रेस नामशेष होण्याच्या मार्गावर होती. आपल्यासमोर आव्हान गंभीर आणि मोठे आहे. पण आम्ही लढायला तयार आहोत. या पराभवाला सर्वजण जबाबदार असल्याचे चिदंबरम म्हणाले.

P. Chidambaram
आप चा रॉयल खर्च, भगवंत मान यांच्या शपथविधीसाठी 2 कोटींची उधळण

'पक्षाचे सरचिटणीस, सचिव आणि प्रभारी पाचही निवडणूक राज्यांमध्ये नियुक्त करण्यात आले होते. मी गोव्यात वरिष्ठ निरीक्षक होतो. बघेल (Bhupesh Baghel) हे उत्तर प्रदेशचे वरिष्ठ निरीक्षक होते. इतर नेत्यांची वेगवेगळ्या राज्यात नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे पराभवाची जबाबदारी सर्वांवर आहे. मी गोव्याची (Goa Assembly Election) जबाबदारी स्वीकारतो. माझे सहकारी गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनीही पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. याचे उत्तर आपण सर्वांनी मिळून शोधायचे आहे,' असे चिदंबरम म्हणाले.

पराभवानंतर गांधी कुटुंबावर उपस्थित होत असलेल्या प्रश्नांवर चिदंबरम म्हणाले की, 'गांधी कुटुंबाला लक्ष्य करणे चुकीचे आहे. सोनिया गांधी यांनी सीडब्ल्यूसीच्या बैठकीत आपण कोणत्याही प्रकारचा त्याग करण्यास तयार असल्याचे सांगितले होते. मात्र पक्षाध्यक्षपदाची निवडणूक ऑगस्टमध्ये होणार आहे. आता नेतृत्वात बदल झाला तर कुणाला तरी अंतरिम अध्यक्ष करावे लागेल. अंतरिम अध्यक्ष काढून पुन्हा कोणालातरी हंगामी अध्यक्ष करण्यात अर्थ नाही. पक्षाच्या अंतर्गत निवडणुकांद्वारेच नवीन पूर्णवेळ अध्यक्षाची निवड व्हावी, अशी या बैठकीत उपस्थित सर्व नेत्यांची इच्छा होती.'

P. Chidambaram
कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन? मोदी सरकारने दिलं असं उत्तर

'हे सत्य आहे की, 5 राज्यांच्या निवडणुकीत आम्हाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पण याचा अर्थ असा नाही की पक्ष विचार न करता निर्णय घेणार,' असे मत पक्षाचे जेष्ठ नेते म्हणून पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले. पक्षाच्या अंतर्गत निवडणुका ऑगस्टमध्ये होणार आहेत. यामध्ये काँग्रेसच्या नूतन अध्यक्षाची निवड होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com