आप चा रॉयल खर्च, भगवंत मान यांच्या शपथविधीसाठी 2 कोटींची उधळण

पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्षाच्या नव्याने स्थापन झालेल्या सरकारचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या शपथविधी सोहळ्यावर 2 कोटींहून अधिक खर्च करण्यात येत आहे.
Bhagwant Mann
Bhagwant MannDainik Gomantak

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या नव्याने स्थापन झालेल्या सरकारचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या शपथविधी सोहळ्यावर 2 कोटींहून अधिक खर्च करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक खर्च हा तंबू उभारण्यासाठी करण्यात येणार आहे. शहीद भगतसिंग यांच्या स्मारकाशेजारील 45 एकर शेत शपथविधी सोहळ्यासाठी भाडेतत्त्वार घेण्यात येत आहे. या शेतामध्ये वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे देखील आश्वासन देण्यात आले आहे. (2 crore will be spent on the swearing-in ceremony of Bhagwant Mann)

दरम्यान, खटकरकलन गावात शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी एक लाख लोकांच्या बसण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे. पंडालमध्ये 40 हजार खुर्च्या ठेवण्याची योजना आहे. याठिकाणी 25 हजार वाहनांसाठी पार्किंग करण्यात येणार आहे. गुजर समाजातील लोक या शेतांमध्ये जनावरांच्या चाऱ्यासाठी गव्हाचे पीक घेतात. पार्किंगसाठी भाड्याने घेण्यात आलेल्या शेतातील गव्हाचे पीक कापणीसाठी आले आहे.

Bhagwant Mann
Punjab Assembly Election Result 2022 : 'पॅड वूमन' ने सिद्धू आणि माजिठिया यांना चारली धूळ

विशेष म्हणजे, पंजाब (Punjab) सरकार पहिल्यांदाच राजधानीतील गव्हर्नर हाऊसबाहेर सार्वजनिकपणे शपथविधी सोहळा घेत आहे. यातून नव्या इतिहासाबरोबरच नव्या परंपरेचीही सुरुवात होत आहे, मात्र यामध्ये होणाऱ्या खर्चाचा बोजा जनतेवर पडणार आहे.

एकरी 46 हजार नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी

शेतकऱ्यांकडून शेतजमिनी भाडे तत्वावर घ्याव्यात. तसेच त्यांच्या पिकाचा योग्य मोबदला दिला जावा, असा करार जिल्हा प्रशासनाने केला आहे. किती भरपाई मिळणार हे मात्र करारात निश्चित केलेले नाही. दरम्यान, नुकसानभरपाईपोटी एकरी किमान 46 हजार रुपये द्यावेत तरच खर्च भागून नुकसान भरुन निघेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाकडून आणखी काही शेत अधिग्रहित करण्यात येणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Bhagwant Mann
Punjab Assembly Election Result 2022 : दिल्लीनंतर आता पंजाब, संपूर्ण देशात इन्कलाब होणार

या खर्चास वित्त विभागाने मंजुरी दिली

पंजाबमधील नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पहिल्यांदाच राजधानीबाहेर होणार आहे. त्यासाठीची तयारीही त्याच पद्धतीने करण्यात येत आहे. या शपथविधी सोहळ्याला एक लाखहून अधिक लोक उपस्थित राहण्याची शक्यता असून त्यादृष्टीने सर्व व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे शपथविधी सोहळ्यासाठी वित्त विभागाने निधीही जारी केला आहे. या शपथविधी सोहळ्यावर सुमारे दोन कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहिती वित्त विभागाकडून देण्यात आली आहे. या संदर्भात वित्त विभागाने दोन कोटी रुपये उपायुक्त शहीद भगतसिंग नगर यांना दिले आहेत.

Bhagwant Mann
Punjab Assembly Election Result 2022 : पंजाबचे माजी CM कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा दारुण पराभव

एडीजीपीसह 35 हून अधिक अधिकारी हजर

शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, डीजीपी पंजाबने खटकरकलनमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आयजी, एसएसपी, डीसीपी आणि एआयजी यांच्यासह 25 अधिकारी तैनात केले आहेत. हे सर्व अधिकारी 13 मार्च रोजी खटकरकलनमधील कॅम्प ऑफिसमध्ये एडीजीपीला अहवाल देतील. नवांशहर जिल्हा प्रशासनातील 30 छोटे-मोठे अधिकारीही तयारीत व्यस्त आहेत.

पंजाबचे नवनियुक्त मुख्यमंत्री भगवंत मान यांचे नवनियुक्त प्रधान सचिव वेणूप्रसाद हेही रविवारी नवनशहरमध्ये पोहोचत आहेत. नवांशहर लगतच्या होशियारपूर, लुधियाना आणि जालंधर जिल्ह्याचे एसडीएम आणि डीएसपी दर्जाचे अधिकारीही इथे तैनात करण्यात आले आहेत. पंजाबचे मुख्य सचिव आणि डीजीपीही शपथविधीच्या एक दिवस आधी इथे पोहोचण्याची शक्यता आहे. समारंभात अग्निशमन दलाव्यतिरिक्त रुग्णवाहिकेसह डॉक्टरांचे विशेष पथकही उपस्थित राहणार आहे.

Bhagwant Mann
Punjab Assembly Elections: काँग्रेसला मोठा धक्का, दोन आमदारांनी भाजपमध्ये केला प्रवेश

व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खासगी शाळेच्या मैदानात उतरणार

खटकरकलन गावातील शहीद भगतसिंग स्मारकाजवळील खासगी शाळेच्या मैदानात चार हेलिपॅड बांधले जात आहेत. कार्यक्रमाला येणाऱ्या इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशिवाय पंजाबचे राज्यपाल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि इतर व्हीव्हीआयपींचे हेलिकॉप्टर या हेलिपॅडवर उतरतील. शाळेच्या मैदानापासून हे लोक रस्त्याने स्मारकाच्या मागे असलेल्या पंडालपर्यंत पोहोचतील. दुसरीकडे हुतात्मा स्मारकाजवळील जागा मोकळी केल्यानंतर इथे घुमटाकार शैलीत मंडप उभारण्यात येत आहेत. अनेक ट्रकमध्ये घुमट आणि तंबूसाठी आवश्यक साधनसामग्री आणण्यात आली असून, कामगार रात्रंदिवस त्या कामात व्यस्त आहेत. कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांसाठी भोजनाचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com