National Herald Case: लोहपुरुष पटेलांनी नेहरुंना अगोदरच दिला होता इशारा; 1950 मध्येच पत्र लिहून केले होते सतर्क

National Herald: नॅशनल हेराल्ड प्रकरणाची पाळेमुळे १९५० पर्यंत जातात. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्वात पहिल्यांदा याबाबत धोक्याची घंटा वाजवली होती.
National Herald money laundering case
Sonia and Rahul GandhiDainik Gomantak
Published on
Updated on

National Herald Case

नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड प्रकरणी गेल्या काही दिवसांपूर्वी आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. यात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे नावे आरोपी म्हणून आली आहेत. याप्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या गांधी कुटुंबीयांना वारंवार तपास यंत्रणेसमोर हजर व्हावे लागते. पण, या प्रकरणाचा इतिहास फार जुना आहे.

इतिहासात डोकावून पाहिले असता नॅशनल हेराल्ड प्रकरणाची पाळेमुळे १९५० पर्यंत जातात. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्वात पहिल्यांदा याबाबत धोक्याची घंटा वाजवली होती. १९५० मधील समोर आलेल्या पत्रांनुसार, आर्थिक व्यवहारात सरकारी प्रभावाच्या संभाव्य गैरवापराबद्दल पटेलांनी नेहरुंना सतर्कतेचा इशारा दिला होता. तसेच, संशयास्पद व्यक्तीकडून पैसे न स्वीकारण्याचा सल्ला दिला होता.

नेहरुंनी पटेलांच्या या सल्ल्याकडे गांभीर्याने पाहिले नाही तसेच आवश्यक तेवढे महत्व दिले नाही, असे तज्ञ दावा करतात. यंग इंडिया लिमिटेडचा कारभार पाहणाऱ्या सोनिया आणि राहुल गांधी यांनी बंद झालेल्या नॅशनल हेराल्डची संपत्ती गपचूप हडपण्यासाठी सरकारचा गैरवापर केला असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

National Herald money laundering case
Miyawaki Forest: गोव्यात तापमानाचा पारा 39 अंश! काँक्रिटीकरणामुळे वाढतोय उष्मा, शहरांत ‘मियावाकी’ वनीकरणाची गरज

वैयक्तिक फायद्यासाठी राजकीय विशेषाधिकाराचा जाणीवपूर्वक गैरवापर केल्याचे ईडीच्या आरोपपत्रातून उघड झाले आहे.

हिमालयन एअरवेजशी संबंधित व्यक्तींनी हेराल्डला ७५ हजार रुपयांची देणगी दिली होती, याबाबत पटेलांनी नेहरुंना पत्र लिहून चिंता व्यक्त केली होती. ही एक अशी कंपनी आहे जिने भारतीय वायुसेनेच्या आक्षेपांना न जुमानता सरकारी करार केला होता. हे राजकीय पक्षपाताचे पहिले उदाहरण असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.

दरम्यान, पटेल देखील मागे हटण्यास तयार नव्हते. वन इंडियाच्या वृत्तानुसार, देणगी देणाऱ्यांपैकी अखानी यांच्यावर बँक फसवणुकीचा आरोप आहे. केंद्रीय मंत्री अहमद किडवई हे जेपी सारख्या लखनौच्या वादग्रस्त उद्योगपतींशी संगनमत करून श्रीवास्तव यांच्याकडून वृत्तपत्रासाठी पैसे मागत असल्याचा त्यांचा आरोप अधिक चिंताजनक होता. त्या दिवशी नेहरूंचे उत्तर अस्पष्ट होते. हेराल्डचे तत्कालीन महाव्यवस्थापक जावई फिरोज गांधी हे याकडे लक्ष देत आहेत, असे नेहरुंनी सांगितले होते.

नेहरु टाळाटाळ करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पटेलांनी दुसऱ्याच दिवशी उत्तर दिले. 6 मे च्या पटेलांच्या पत्रात त्यांनी काही देणग्या खाजगी कंपन्यांशी कशा प्रकारे जोडल्या गेल्या आणि कोणत्याही धर्मादाय हेतूचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून दिले.

नेहरूंनी देखील याप्रकरणी उत्तर देत, तीन वर्षांपासून त्यात सहभागी नसल्याचे स्पष्ट केले तसेच त्यांनी मृदुला नावाच्या कोणाला तरी जबाबदारी सोपवली होती, असे सांगितले.

National Herald money laundering case
Himalaya Base Camp: गोमंतकीय 'रितेश'ने केली हिमालय बेस कँप मोहीम फत्ते! ठरला पहिला दिव्यांग गिर्यारोहक

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि या प्रकरणातील याचिकाकर्ते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी सातत्याने सार्वजनिक मालमत्ता हडपण्याचा गांधी कुटुंबाचा "सुनियोजित कट" असल्याचे अधोरेखित केले आहे. स्वामींचे दावे भाजपच्या व्यापक टीकेशी सुसंगत आहेत की, "काँग्रेस एक कुटुंब चालवणारा उद्योग आहे या पक्षात वैयक्तिक फायद्यासाठी राजकीय प्रभावाचा व्यापार केला जातो."

पटेलांच्या इशाऱ्याचा हवाला देऊन, भाजप राष्ट्र-प्रथम आदर्श आणि काँग्रेसच्या घराणेशाही राजकारण यांच्यातील मूलभूत फरक अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतेय. नॅशनल हेराल्ड प्रकरण हे केवळ कायदेशीर लढाईच्या पुढे गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com