
पणजी: डिचोली येथील दिव्यांग गिर्यारोहक रितेश वायगणकर याने स्पृहणीय साहस प्रदर्शित करताना नेपाळमधील हिमालयातील अन्नपूर्णा बेस कँप ट्रेकिंग मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली. कठीण पराक्रम साधणारा तो पहिला गोमंतकीय दिव्यांग ठरला.
रितेश याने अन्य दिव्यांग गिर्यारोहक टिंकेश कौशिक, रचित, नितीन, दीपेंद्र यांच्यासह नऊ दिव्यांग नसलेल्या सदस्यांच्या पथकासह हिमालयातील अवघड ट्रेकिंग (पदभ्रमण) उपक्रम १३ ते २४ एप्रिल या कालावधीत पूर्ण केला.
टिकेंश ॲबिलिटी फाऊंडेशन आणि अद्वैत आऊटडोअर्स यांच्यातर्फे उपक्रम घेण्यात आला रितेश ८८ टक्के गंभीर दिव्यांग आणि उजव्या पायाचे अंगविच्छेदन असलेला व्यक्ती आहे. त्याने पायाचे अंगविच्छेदन असूनही ७५ किलोमीटर अंतर चालण्याचे धाडस अदम्य इच्छाशक्तीने पूर्ण केले.
विजेच्या अपघातातून बचावल्यानंतर रितेश याच्या डाव्या हाताला आकुंचन असून पायाचा खालील भाग गमावलेला आहे. गोव्यातील कौशल्य विकास व उद्योजकता विभागात रितेश सध्या व्यावसायिक मार्गदर्शक या नात्याने कार्यरत आहे.
अन्नपूर्णा बेस कँप सर करण्याच्या अनुभवाविषयी रितेश वायगणकर याने सांगितले, की “कणखर मानसिकतेच्या बळावर कोणतेही आव्हान साध्य पार करता येते. प्रत्येक लहान पाऊल महत्त्वाचे असते आणि कोणतीही पायची चुकविली नाही, तर अशक्य वाटणारी गोष्ट शक्य बनविता येते. हा टप्पा गाठू शकलो याचा मला अभिमान आहे आणि इतरांना त्यांच्या स्वप्नांसाठी धाडस करण्याची प्रेरणा मिळो हीच आशा बाळगतो.”
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.