Monsoon Arrival in Kerala: प्रतीक्षा संपणार! मान्सून 4 जूनला केरळमध्ये धडकणार; कोकण, गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा

IMD Kerala Monsoon Arrival 2026: भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाबाबत (मान्सून) अत्यंत महत्त्वाची अपडेट दिली.
IMD Kerala Monsoon Arrival 2026
Monsoon Arrival in KeralaDainik Gomantak
Published on
Updated on

IMD Kerala Monsoon Arrival 2026: भारतीय हवामानशास्त्र विभागाने यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाबाबत (मान्सून) अत्यंत महत्त्वाची अपडेट दिली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा मान्सून 4 जूनला केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. दरवर्षी मान्सूनच्या आगमनाकडे संपूर्ण देशातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागलेले असते. केरळमधील आगमनानंतर साधारणपणे पुढील काही दिवसांत मान्सून देशाच्या इतर भागात दाखल होतो. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये होणारे मान्सूनचे आगमन हा देशातील यंदाच्या पावसाळ्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

मान्सून केरळच्या उंबरठ्यावर असतानाच, दुसरीकडे महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला. आयएमडीच्या अंदाजानुसार, 2 जून ते 6 जून दरम्यान कोकण, गोवा (Goa) आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत राहू शकतो, ज्यामुळे नागरिकांनी आणि विशेषतः मच्छिमारांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

IMD Kerala Monsoon Arrival 2026
Goa Pre-Monsoon Rain: वरुणराजा रुसला! पावसाची सरासरी घटली, उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण; उत्तर गोव्याची बिकट अवस्था

याशिवाय, मराठवाड्यात 2 जून ते 4 जून दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे, तर शेजारील गुजरात राज्यात 2 जून ते 5 जून या कालावधीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस हजेरी लावू शकतो. एकंदरीत जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागांत मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व हालचाली तीव्र होणार आहेत. केरळमध्ये 4 जून रोजी मान्सूनचे आगमन वेळेवर झाल्यास, महाराष्ट्रातही तो वेळेत दाखल होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

IMD Kerala Monsoon Arrival 2026
Goa Unseasonal Rain: पावसामुळे गोमंतकीयांना किंचित दिलासा, राज्‍याच्‍या काही भागांत बरसला; तरीही उकाडा

सध्या निर्माण झालेल्या वातावरणामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com