Goa Pre-Monsoon Rain: वरुणराजा रुसला! पावसाची सरासरी घटली, उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण; उत्तर गोव्याची बिकट अवस्था

IMD Goa weather Report: राज्यात यंदाच्या मान्सूनपूर्व काळात सरासरीपेक्षा तब्बल ४६ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. त्‍यामुळे आगामी मान्सूनबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
IMD Goa weather Report
Goa Pre-Monsoon RainDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात यंदाच्या मान्सूनपूर्व काळात सरासरीपेक्षा तब्बल ४६ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. त्‍यामुळे आगामी मान्सूनबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. राज्य हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च ते १० मे २०२६ या कालावधीत राज्यात केवळ ८.८ मि. मी. पावसाची नोंद झाली. सरासरीने या काळात १६.३ मिमी पाऊस अपेक्षित असतो.मान्सून अधिकृतपणे दाखल होण्यापूर्वी मार्च ते जूनदरम्यान पडणाऱ्या पावसाला ‘मान्सूनपूर्व पाऊस’ म्हटले जाते.

IMD Goa weather Report
Goa Unseasonal Rain: पावसामुळे गोमंतकीयांना किंचित दिलासा, राज्‍याच्‍या काही भागांत बरसला; तरीही उकाडा

मान्सूनपूर्व पावसाचा मोठा उपयोग होतो तो शेती, जलसाठे आणि वातावरणातील उष्णता कमी करण्यासाठी असतो. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उष्णतेची तीव्रता कायम असून, काही भागांमध्ये पाण्याच्या उपलब्धतेवरही परिणाम जाणवू लागला आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, उत्तर गोव्यात या काळात १४.८ मि.मी. पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र केवळ २.४ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे उत्तर गोव्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल ८३.९ टक्के घट झाली आहे.

दक्षिण गोव्यात परिस्थिती तुलनेने कमी गंभीर असली तरी तेथेही पावसात घट दिसून आली आहे. दक्षिण गोव्यात १७.७ मि.मी. पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता; मात्र प्रत्यक्षात १४.४ मि.मी. पाऊस झाला असून, ही घट १८.३ टक्के इतकी आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा मान्सूनपूर्व पाऊस पडत असला तरी त्याचा प्रभाव मर्यादित राहिला आहे. शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक भागांत मान्सूनपूर्व सरींनी जोरदार हजेरी लावली असताना गोव्यात मात्र अपेक्षित प्रमाणात पाऊस झालेला नाही.

IMD Goa weather Report
Goa Unseasonal Rain: गोव्यात अवकाळी पावसाचा तडाखा; सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक ठिकाणी पडझड! सत्तरी, डिचोली आणि पेडण्यात झाडे उन्मळून पडल्याने घरांचे मोठे नुकसान

हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनपूर्व पावसातील ही घट स्थानिक तापमान वाढीस कारणीभूत ठरू शकते. विशेषतः किनारी आणि शहरी भागांत उष्ण व दमट वातावरण अधिक जाणवत असून, नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. आगामी काही दिवसांत वातावरणात बदल होऊन मे अखेरीस पावसाचे प्रमाण वाढू शकते, असा अंदाज वर्तविण्‍यात येत आहे.

IMD Goa weather Report
Goa Unseasonal Rain: कुठे सुखद गारवा, तर कुठे नुकसानीचा मारा! गोव्यात अवकाळी पावसाची एन्ट्री; आंबा-काजू बागायतदार संकटात VIDEO

मान्सूनपूर्वची स्थिती

सरासरी अपेक्षित पाऊस : १६.३ मि.मी.

यंदाची नोंद : ८.८ मि.मी.

एकूण घट : ४६.३ टक्के

उत्तर गोव्यात

फक्त २.४ मि.मी.

अपेक्षित पाऊस : १४.८ मि.मी. प्रत्यक्षात नोंद : २.४ मि.मी. घट : ८३.९ टक्के

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com