मॅट्रिमोनियल साईटवर 'आदित्य पटेल' बनून 100 महिलांची शिकार, 8000 पेक्षा जास्त आक्षेपार्ह व्हिडिओ-फोटो जप्त; करीम सिपाहीचा पर्दाफाश

Matrimonial Site Fraud: एका पीडित महिलेने धैर्याने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून तपास सुरु केला आणि या मोठ्या सेक्स व ब्लॅकमेलिंग रॅकेटचा पर्दाफाश केला.
Matrimonial Site Fraud
Matrimonial Site FraudDainik Gomantak
Published on
Updated on

Matrimonial Site Fraud: मॅट्रिमोनियल साईट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले नाव आणि खरी ओळख लपवून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, नंतर त्यांचे लैंगिक व आर्थिक शोषण करुन त्यांना ब्लॅकमेल करण्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील मुख्य आरोपीची ओळख करीम सिपाही अशी झाली असून, त्याने स्वतःचे नाव 'आदित्य पटेल' असे सांगून तब्बल 100 हून अधिक महिलांची फसवणूक केली.

एका पीडित महिलेने (Women) धैर्याने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून तपास सुरु केला आणि या मोठ्या सेक्स व ब्लॅकमेलिंग रॅकेटचा पर्दाफाश केला, ज्याच्या व्याप्तीने पोलीस अधिकारीही चक्रावून गेले.

Matrimonial Site Fraud
Uttar Pradesh Crime: माणुसकीला काळिमा! 'घरात लग्न आहे, अपशकुन होईल...' आईचा मृतदेह घेण्यास मुलाचा नकार, वृद्ध बाप ढसाढसा रडला; अंत्यसंस्कारही झाले नाही

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी करीम सिपाही हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने वेगवेगळ्या मॅट्रिमोनियल वेबसाईटवर 'आदित्य पटेल' या नावाने बनावट प्रोफाईल्स तयार केली होती. या प्रोफाईल्सवर तो स्वतःला अतिशय प्रतिष्ठित, गर्भश्रीमंत, सुशिक्षित आणि संस्कारी व्यक्ती म्हणून सादर करत असे, जेणेकरुन लग्नइच्छुक मुली सहजपणे त्याच्यावर विश्वास ठेवतील. एकदा का या मुली त्याच्या गोड बोलण्याला भुलून त्याच्यावर विश्वास ठेवू लागल्या, की तो त्यांच्याशी जवळीक साधायचा.

Matrimonial Site Fraud
Uttar Pradesh Storm: उत्तर प्रदेशात वादळ आणि पावसाचे 100 बळी, जनजीवन विस्कळीत; बाधितांना आर्थिक मदत देण्याचा मुख्यमंत्र्यांचा आदेश

महिलांना पूर्णपणे विश्वासात घेतल्यानंतर तो त्यांच्याकडून त्यांचे अत्यंत खाजगी आणि वैयक्तिक फोटो तसेच व्हिडिओ मिळवायचा. एकदा हे आक्षेपार्ह साहित्य हाती आले की, करीमचा खरा चेहरा समोर यायचा आणि तो ब्लॅकमेलिंगचा घाणेरडा खेळ सुरु करायचा. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तो महिलांना घाबरवायचा, धमकावायचा आणि त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी वसूल करायचा.

Matrimonial Site Fraud
Uttar Pradesh Crime: 'राजकारण करण्यासाठी येऊ नका'; राहुल गांधींच्या भेटीपूर्वीचा रायबरेली लिचिंग पीडित कुटुंबाचा VIDEO व्हायरल

महिलांना आपल्यावर कोणताही संशय येऊ नये आणि आपली खरी मुस्लिम ओळख लपून राहावी, यासाठी करीम सिपाहीने 'आदित्य पटेल' या हिंदू नावाने अनेक बनावट सरकारी कागदपत्रेही तयार करुन घेतली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर घेतलेल्या झडतीत त्याच्याकडून बनावट पासपोर्ट, बनावट ड्रायव्हिंग लायसन्स, विजिटिंग कार्ड्स आणि बनावट आधार कार्ड यांसारखे बनावटीकरणाचा मोठा पुरावा असलेले दस्तऐवज हस्तगत केले. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे तो आजवर पोलिसांच्या आणि कायद्याच्या नजरेतून स्वतःला वाचवत आला होता.

Matrimonial Site Fraud
Uttar Pradesh Crime: हुंड्यासाठी विवाहितेला जाळले; पळून जाणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या गोळीबारात जखमी

आरोपीला बेड्या ठोकल्यानंतर पोलिसांनी जेव्हा त्याचे मोबाईल आणि लॅपटॉप यांसारखी डिजिटल उपकरणे जप्त करुन फॉरेन्सिक तपासणी केली, तेव्हा तपासाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला. करीमच्या मोबाईल फोनमधून वेगवेगळ्या 8000 हून अधिक महिलांचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ पोलिसांना सापडले. यासोबतच त्याच्या लॅपटॉपमध्ये शेकडो महिलांच्या प्रोफाईल्सचा डेटा मिळाला. पोलिसांनी जप्त केलेल्या या डेटाच्या आधारे पीडित महिलांची संख्या 100 च्या पार असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Matrimonial Site Fraud
Uttar Pradesh Crime: पुत्रप्राप्तीचा हव्यास! गरोदर पत्नीसोबत पतीचं दुष्कृत्य; कोर्टाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा

सध्या पोलीस सर्व डिजिटल पुराव्यांची कसून चौकशी करत असून, या सायबर गुन्हेगाराविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जात आहे. इंटरनेटवरील अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवताना काळजी घेण्याचे आवाहनही पोलिसांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com