Mallikarjun Kharge: काँग्रेसमध्ये CWC ऐवजी 47 सदस्यांची स्टीअरिंग कमिटी घेणार महत्वाचे निर्णय

काँग्रेस अध्यक्ष खरगेंचा पहिला निर्णय; कमिटीत थरूर यांना स्थान नाही
Mallikarjun Kharge
Mallikarjun KhargeDainik Gomantak

Mallikarjun Kharge: काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी बुधवारी पक्षाच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारली. त्यांनी काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची (CWC) बैठक घेतली. खरगे यांनी अध्यक्ष म्हणून घेतलेल्या पहिल्याच निर्णयात CWC ऐवजी 47 सदस्यांच्या स्टीअरिंग कमिटीची घोषणा केली.

Mallikarjun Kharge
Kejriwal On Currency Note: नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो छापा; केजरीवालांची मागणी, गांधींच्या फोटोविषयी म्हणाले...

CWC ही काँग्रेसची सर्वोच्च कार्यकारी संस्था आहे. पण खऱगेंच्या घोषणेनुसार आता पक्षाशी संबंधित महत्वाचे निर्णय ही स्टीअरिंग कमिटीच घेईल. या स्टीअरिंग कमिटीत सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंह, राहुल गांधी, दिग्विजय सिंह यांच्यासह 47 जण आहेत. विशेष म्हणजे, यात खरगेंविरोधात काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविणाऱ्या खा. शशी थरूर यांना घेतलेले नाही.

खरगे म्हणाले की, पक्षात 50 टक्के पदे 50 पेक्षा कमी वय असणाऱ्यांना दिले जाईल. उदयपुरात हा प्रस्ताव मंजुर झाला होता, त्यावर आता अंमलबजावणी केली जाईल. नवा भारत बनविण्याच्या नावाखाली काँग्रेसमुक्त भारताचा नारा दिला गेला. पण ते कधीही पुर्णत्वास जाणार नाही. खरगे यांनी भाषणातून केंद्रातील भाजप सरकारवही टीका केली.

Mallikarjun Kharge
Modi-Sunak will Meet in G20: पंतप्रधान मोदी-ऋषी सुनक यांची लवकरच होणार भेट

दरम्यान, सध्या प्रियांका गांधी यांचेच वय 50 असून काँग्रेसचे इतर नेते त्याहून जास्त वयाचे आहेत. स्वतः खरगे यांचे वय 80 आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात खरगे यांनी सोनिया, राहुल आणि प्रियांका गांधी-वड्रा यांच्या उपस्थितीत अध्यक्षपद निवडणुकीतील विजयाचे प्रमाणपत्र स्विकारले.

पद सोडल्याने दिलासा : सोनिया गांधी

दरम्यान यावेळी बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या की, खरगेंकडे अध्यक्षपद सोपवून आता मला खुप दिलासा वाटत आहे. माझ्या शिरावरून जबाबदारी उतरली आहे. नव्या अध्यक्षांना माझ्या शुभेच्छा. ते अनुभवी आणि जमिनीशी जोडले गेलेले नेते आहेत. कष्ट आणि त्यागातून ते येथेपर्यंत पोहचले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com