Modi-Sunak will Meet in G20: पंतप्रधान मोदी-ऋषी सुनक यांची लवकरच होणार भेट

नोव्हेंबर महिन्यात बाली येथील जी-20 समिटमध्ये दोन्ही नेते होणार सहभागी
PM Narendra Modi PM Rishi Sunak
PM Narendra Modi PM Rishi SunakDainik Gomantak
Published on
Updated on

Modi-Sunak will Meet in G20: ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय मूळाचे ऋषी सुनक यांची निवड झाल्यानंतर भारतात मोठा उत्साह आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींनी सुनक यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान लवकरच पंतप्रधान मोदी यांची ऋषी सुनक यांच्याशी भेट होण्याची शक्यता आहे.

PM Narendra Modi PM Rishi Sunak
Kejriwal On Currency Note: नोटांवर गणपती, लक्ष्मीचा फोटो छापा; केजरीवालांची मागणी, गांधींच्या फोटोविषयी म्हणाले...

इंडोनेशियात पुढील महिन्यात होणाऱ्या जी-20 शिखर संमलेनात हे दोन्ही नेते सहभागी होणार आहे. त्यामुळे तेव्हा हे नेते एकाच मंचावर येतील. 15 आणि 16 नोव्हेंबर रोजी बाली येथे ही परिषद होणार आहे.

तथापि, या दोन्ही नेत्यांच्या द्विपक्षीय भेटीबाबत अद्याप दोन्ही देशांकडून अधिकृत निवेदन करण्यात आलेले नाही. पण जगातील 20 मोठ्या अर्थव्यवस्थांच्या या परिषदेत दोन्ही नेते एकत्र असतील आणि ते एकत्रितरित्या या परिषदेतील अनेक कार्यक्रमात सहभागी होतील.

या संभाव्य भेटीतच भारत आणि ब्रिटन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार कराराला गती मिळू शकते, अशी चर्चा आहे. या करारावर सही करण्यासाठी पंतप्रधान मोदी लंडनलाही जाऊ शकतात.

PM Narendra Modi PM Rishi Sunak
Lord Ganesh On Currency: मुस्लिमबहुल इंडोनेशियात नोटेवर गणपतीचा फोटो का?

ऋषी सुनक हे बँकर आहेत. भारतीय उद्योजक आणि इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मुर्ती यांचे ते जावई आहेत. ब्रिटन वाईट आर्थिक स्थितीतून जात असताना त्यांच्याकडे पंतप्रधानपदाची सुत्रे आली असून पंतप्रधानांच्या 10 डाऊनिंग स्ट्रीट या निवासस्थानावरून मार्गदर्शन करताना त्यांनी आर्थिक आव्हानांचा सामना करण्यात यशस्वी होऊ, अशा आशावाद व्यक्त केला आहे. कोरोना महारोगराई आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे ही परिस्थिती ओढवल्याचेही ते म्हणाले.

महिनाभराच्या राजकीय आणि आर्थिक उलथापालथीनंतर ब्रिटनमध्ये आता स्थिर सरकार येईल, असा विश्वासही सुनक यांनी व्यक्त केला आहे. माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी केलेल्या चुका दुरूस्त करण्यासाठी हुजुर पक्षाने पंतप्रधान म्हणून निवडल्याचे ते म्हणाले होते. ट्रस या सकारात्मक बदलासाठी आग्रही होत्या. पण काही चुका झाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com