Exit Polls 2022 : यूपीत भाजप; पण 'या' चार राज्यात कोणाची सत्ता येणार?

Exit Polls 2022 : यूपी प्रमाणे चार राज्यात भाजपची सत्ता येणार की पंजाबप्रमाणे सत्ता जाणार...
Exit Poll 2022 News | Latest election news in Marathi
Exit Poll 2022 News | Latest election news in Marathi Dainik Gomantak
Published on
Updated on

Exit Polls 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान झाले त्यानंतर देशातील जनतेची उत्सुकता असणाऱ्या एक्झिट पोलचे निकाल झळकण्यास सुरूवात झाली. हे एक्झिट पोल उत्तर प्रदेश तसेच पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर राज्याचे आहेत. मात्र, काही वेळा एक्झिट पोल चुकीचे ठरतात. (Like UP, BJP will come to power in all the other four states?)

आज सायंकाळी हाती आलेल्या एक्झिट पोलचे निकाल प्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगीराज यांची सत्ता असेल. तर पंजाबचा कौल हा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या बाजूने असेल. उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागांसाठी मतदान पार पडले असून सत्ता स्थापनेसाठी 202 जागां जिंकाव्या लागतील. एक्झिट पोलनुसार काँग्रेसला दोन आकडी संख्याही गाठणे अवघड ठरणार असल्याने उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. (Latest election news in Marathi)

Exit Poll 2022 News | Latest election news in Marathi
Uttar Pradesh Exit Poll 2022: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगी सरकार

तर याच्या उलट स्थिती पंजाबमध्ये पहायला मिळेत असे दिसते. येथे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे भाजपसोबत जात युती केली. येथे या युतीला जनतेने नाकारल्याचे एक्झिट पोलवरून दिसत आहे. पंजाबमध्ये आपचे सरकार येऊ शकते. तर आप पक्षाला 51 ते 61 टक्के मते मिळू शकतात. तर आप पक्षाला 117 जागांवर आपला लॉटरी लागण्याची शक्यता दिसत आहे. तर 'आप' (AAP) ला 76-90 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 19-31 तर भाजपला 1-4 जागा मिळू शकतात. पंजाबमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी 58 जागांची गरज आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी काँग्रेसला सत्ता काबीज करता येणार नसून भाजपला दोन आकडी संख्याही गाठणे कठीण आहे. तर गोव्यात भाजपची सत्ता असताना तेथे त्रिशंकु स्थिती निर्माण झाली आहे. पण इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार गोव्यात पुन्हा एकदा भाजपचे (BJP) सरकार स्थापन होणार असल्याचे चित्र होते. इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, राज्यात भाजपला 16-22 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला (Congress) 11-17 जागा मिळू शकतात. आम आदमी पक्षाला (AAP) 0-2 जागा मिळू शकतात तर इतरांना 4-5 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र इतर संस्थांचे एक्झिट पोल पाहीले असता गोव्यात वेगळीच स्थिती निर्माण झाल्याचे समोर येत असून तेथे त्रिशंकु स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे तेथे कोणाची? कोणत्या पक्षाची सत्ता येणार हे स्पष्ट सांगता येणार नाही.

Exit Poll 2022 News | Latest election news in Marathi
Exit Poll 2022: पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार?

उत्तराखंडच्या बाबतीत सांगायचे झाले तर येथे कांटे की टक्कर पहायला मळत आहे. 70 जागांसाठी मतदान (Voting) झाले असून अनेकांचे भवितव्य इव्हीएम मशीनमध्ये (EVM machine) बंद झाले होते. आज आलेल्या एक्झिट पोलच्या निष्कर्शावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत होईल असे दिसत आहे. तर काँग्रेस 32 ते 38, भाजपकडे 26 ते 32, आम आदमी पार्टी 0 ते 2 आणि इतरांना 3 ते 7 जागा मिळू शकतात. तर बहुमतासाठी फक्त 36 जागांची गरज असून एक्झिट पोलच्या निष्कर्शावरून काँग्रेस सत्ता काबीज करेल असे दिसून येत आहे. मणिपूरमध्ये भाजपचीच सत्ता येईल असेच चित्र निर्माण झाले आहे. गोवा (Goa) या राज्याप्रमाणेच मणिपूरही (Manipur) छोटे राज्य आहे. मणिपूर मध्ये 60 जागांसाठी लढत रंगली असून मुख्य लढत जरी काँग्रेस-भाजपमध्ये होत आहे. असे असलेतरिही एनपीएफला, एनपीपीला आणि इतरांना मिळणाऱ्या यशामुळे काँग्रेस-भाजप ला जागा कमी येऊ शकतात. झी न्यूजच्या एक्झिट पोलनुसार, 60 सदस्यांच्या विधानसभेत (Legislative Assembly) भाजप पुन्हा एकदा सत्तेत येत शकते. येथे भाजप (BJP) युतीला 23 ते 27 जागा मिळतील. काँग्रेसला (Congress) 12-17 तर एनपीएफला 3-5 जागा मिळू शकतात. एनपीपीला 2-4 आणि इतरांना 2-5 जागा मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com