Uttar Pradesh Exit Poll 2022: उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगी सरकार

Exit Poll 2022 : उत्तर प्रदेशमध्ये सत्तेच्या चाव्या मात्र भाजपकडे; सायकलला लागणार ब्रेक
Yogi Adityanath
Yogi Adityanathdainikgomantak
Published on
Updated on

Uttar Pradesh Exit Poll 2022: देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांमध्ये निवडणूका पार पडल्या. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदानही झाले आहे. यानंतर एक्झिट पोल दाखवले जातील. तर आता निकालासाठी काही दिवस शिल्लक आहेत. 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत. त्यापूर्वी एक्झिट पोलनुसार कोणत्या राज्यात कोणाचा पारडं जड हे समोर येईल. हे एक्झिट पोल उत्तर प्रदेश तसेच पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी असतील. एक्झिट पोलमधून निवडणुकीच्या निकालाचे चित्र समोर आले आहे. मात्र, काही वेळा एक्झिट पोल चुकीचे ठरतात. त्यामुळे खरे चित्र हे 10 मार्चलाच स्पष्ट होईल. (Yogi government again in Uttar Pradesh)

तर 403 सदस्य संख्या असलेल्या उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेमध्ये भाजपच मारणार असल्याचं प्रमुख एक्झिट पोल्समधून स्पष्ट झालं आहे. रिपब्लिक टीव्ही, ईटीडी रिसर्च, न्यूज 18 आणि हिंदुस्थान टाईम्स या प्रमुख माध्यमांनी केलेल्या सर्व्हेमधून उत्तर प्रदेशचा गड भाजपच राखणार असून समाजवादी पक्षाला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागणार आहे.

ABP माझावरून आलेल्या एक्झिट पोलमधून भाजपच्या जवळपास 70 ते 80 जागांमध्ये घट होईल असा अंदाज आहे. मात्र सत्तेच्या चाव्या मात्र भाजपकडे कायम राहणार आहेत.

Yogi Adityanath
Exit Poll 2022: उत्तराखंडमध्ये काँग्रेस की भाजप?

सीएनएन न्यूज 18 च्या एक्झिट पोलनुसार, यूपीमध्ये पुन्हा एकदा योगी सरकार येण्याची शक्यता असून भाजपला 240 जागा मिळताना दिसत आहेत. दुसरीकडे, समाजवादी पक्षाला 140 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बसपाच्या खात्यात 17 आणि इतरांच्या खात्यात 6 जागा पडतील.

तर टाइम्स नाऊच्या म्हणण्यानुसार योगी आदित्यनाथ यूपीमध्ये पुन्हा एकदा योगीच असतील. येथे भाजपला (BJP) 225 जागा मिळतील. समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) 151 तर बहुजन समाज पार्टीला (BSP) 14 जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांना 13 जागा मिळू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com