Exit Poll 2022
Exit Poll 2022Dainik Gomantak

Exit Poll 2022: पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार?

Exit Poll 2022: पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला 76-90 जागा मिळण्याची शक्यता
Published on

Exit Poll 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. संध्याकाळी मतदान संपल्यानंतर एक्झिट पोल दाखवले जातील. हे एक्झिट पोल उत्तर प्रदेश तसेच पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी असतील. तर या पाच राज्यांमध्ये कोणाचं सरकार स्थापन होणार? कोण बाजी मारणार आणि कोण आपलं तख्त राखणार हे स्पष्ट होईल. मात्र याच्याआधी राजकीय विश्लेशक आणि Exit Poll यांनी आप आपला अंदाज वर्तवण्याचे सुरू केलं आहे. त्यामुळे या पाच राज्यात आपली सत्ता आणण्यात भाजप यशस्वी होतं का? पंजाब काय होणार? पुन्हा दलित-सिख नेता चरणजीत सिंह चन्नी मुख्यमंत्री होणार? की माळ कोणा वेगळ्याच नेत्याच्या गळ्यात पडणार? की राज्यात सत्तेत आप मैदान मारणार का असे एक ना अनेक प्रश्न सामान्य मतदारांच्या मनात आहेत. (information about Exit poll 2022) हाती आलेल्या एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये आप सरकार येण्याची चिन्हे दिसत आहेत.

Exit Poll 2022
Exit Poll 2022: एक्झिट पोल म्हणजे नक्की काय?

या एक्झिट पोलनुसार (Exit poll) पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होण्याची शक्यता असून 117 जागांवर आपला लॉटरी लागण्याची शक्यता दिसत आहे. तर 'आप' (AAP) ला 76-90 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 19-31 तर भाजपला 1-4 जागा मिळू शकतात.

दरम्यान, टुडेज चाणक्य एक्झिट पोलच्या निकालानुसार, पंजाबमध्ये AAP ला 100 जागा, काँग्रेसला 10, अकाली-BSP युतीला 6, भाजपला 1 आणि इतरांना शून्य जागा मिळतील असे कळत आहे. तर मतांची टक्केवारीनुसार आपच्या 45, काँग्रेसची मतांची टक्केवारी 23, अकाली-बसपाची मतांची टक्केवारी 16, भाजपची मतांची टक्केवारी 9 आणि इतरांची मतांची टक्केवारी 7 असेल.

तर एबीपी माझाच्या सर्वेक्षणानुसार पंजाबमध्ये 'आप'ला 51 ते 61 जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेससाठी दलित मुख्यमंत्र्यांची बाजी काही विशेष सिद्ध होताना दिसत नाही. मात्र काँग्रेसने 22 ते 28 जागांवर दावा केला आहे. पंजाबमध्ये अकाली दलाची काँग्रेसशी कडवी झुंज होऊ शकते. सर्वेक्षणात अकाली दल आघाडीला 20 ते 26 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजप-कॅप्टन युतीला 7 ते 13 आणि इतरांना 1 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

दरम्यान इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार पंजाबमध्ये काँग्रेस बहुमताच्या जवळ असल्याचे कळत असून काँग्रेसला ४९-५९ जागांचा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला 2-6 जागा मिळू शकतात. आणि इतरांना 1-3 जागा मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, अन्य एक्झिट पोलमध्ये पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्याचे दिसत आहे. इंडिया टीव्हीच्या वृत्तानुसार 'आप'ला 27-37 जागा मिळताना दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com