पदक आणि नोकरीचे आमिष दाखवून करायचा शोषण... योग गुरु निरंजन मूर्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 8 महिलांनाही बनवले वासनेचे शिकार

Karnataka Sexual Assault Case: कर्नाटकमध्ये एका योग गुरुला अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाखाली अटक करण्यात आल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
Karnataka Sexual Assault Case
Sexual Assault CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Karnataka Sexual Assault Case: कर्नाटकमध्ये एका योग गुरुला अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाखाली अटक करण्यात आल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका 17 वर्षीय मुलीच्या तक्रारीवरुन पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन ही कारवाई केली.

पोलिसांच्या तपासानुसार, या योग गुरुने केवळ याच मुलीचेच नाहीतर आणखी 8 महिलांनाही आपल्या वासनेचे शिकार बनवले. यामध्ये अनेक तरुण मुलींचाही समावेश आहे. पीडित मुलीने दाखवलेल्या हिमतीमुळे या योग गुरुचा घृणास्पद चेहरा समोर आला. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीनंतर या योग गुरुला बेड्या ठोकल्या.

थायलंड प्रवासात केले शोषण

बंगळूरु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योग गुरु निरंजन मूर्ती राजराजेश्वरी नगरमध्ये एक योग केंद्र चालवतो. पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, ती मूर्तीला 2019 पासून ओळखत होती. तिने 2021 पासून त्याच्याकडे योगासन स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. 2019 ते 2021 पर्यंत तिने त्याच्याकडून योगाचे प्रशिक्षण घेतले.

पीडितेच्या आरोपानुसार, 2020 मध्ये निरंजन मूर्ती तिला राष्ट्रीय स्तरावरील योग स्पर्धेत पदक मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिच्याशी मैत्री केली. 2023 मध्ये, जेव्हा ती 17 वर्षांची होती, तेव्हा एका कार्यक्रमासाठी ती मूर्तीसोबत थायलंडला गेली होती. याच प्रवासादरम्यान निरंजन मूर्तीने कथितपणे तिचे लैंगिक शोषण केले.

Karnataka Sexual Assault Case
Karnataka Accident: कर्नाटकात गणपती विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 9 जणांचा चिरडून मृत्यू, 20 जखमी

पदक आणि नोकरीच्या बहाण्याने केले लैंगिक संबंध

दरम्यान, या घटनेनंतर पीडित मुलीने (Girl) योग स्पर्धांमध्ये भाग घेणे बंद केले. मात्र, आरोपीने तिचा पाठलाग करणे सोडले नाही. पीडितेच्या आरोपानुसार, ऑगस्ट 2025 मध्ये निरंजन मूर्ती पुन्हा तिच्या संपर्कात आला. यावेळी त्याने तिला राष्ट्रीय स्तरावरील योग स्पर्धेत पदक मिळवून देण्याचे आणि नोकरी देण्याचे आमिष दाखवले. या बहाण्याने त्याने तिच्यासोबत पुन्हा शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर अखेर मुलीने धैर्य दाखवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Karnataka Sexual Assault Case
Karnataka Bus Accident: भीषण अपघात! बस लॉरी ट्र्कवर जाऊन आदळली; तिघांचा जागीच मृत्यू, 7 जण गंभीर

आणखी 8 महिलांनाही शिकार बनवले

या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता, निरंजन मूर्तीने इतर 8 महिलांनाही (Womens) लैंगिक शोषण करुन त्यांचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले. या महिलांमध्येही अनेक तरुणींचा समावेश आहे. आरोपी निरंजन मूर्ती मागील अनेक वर्षांपासून राजराजेश्वरी नगरमध्ये योग केंद्र चालवतो. इतकेच नव्हे, तर तो कर्नाटक योगासन खेल संघ (KYSA) चा सचिव देखील आहे. त्याने आपल्या या पदाचा गैरवापर करुन अनेक महिलांचा गैरफायदा घेतला असल्याची शक्यता आहे.

Karnataka Sexual Assault Case
Karnataka Tiger Death: वाघीणसह 4 बछड्यांचा संशयास्पद मृत्यूने खळबळ! कर्नाटकच्या वनमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

पोलिसांचे पीडित महिलांना आवाहन

दुसरीकडे, हा सनसनाटी प्रकार समोर आल्यानंतर बंगळूरु पोलिसांनी सार्वजनिक आवाहन केले. पोलिसांनी म्हटले की, जर या योग गुरुने इतर कोणत्याही महिला किंवा मुलीसोबत लैंगिक शोषण किंवा बलात्कार केला असेल, तर त्यांनी तात्काळ राजराजेश्वरी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. पोलिसांनी तक्रारदारांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

हे प्रकरण उघडकीस आल्याने समाजाला एक प्रकारचा धक्का बसला आहे. एका महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीने असा घृणास्पद गुन्हा केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पोलिसांचा तपास सुरु असून या प्रकरणात आणखी अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com