Karnataka Bus Accident: भीषण अपघात! बस लॉरी ट्र्कवर जाऊन आदळली; तिघांचा जागीच मृत्यू, 7 जण गंभीर

Yellapur Bus Accident: येल्लापूर तालुक्यातील मावळी क्रॉसजवळ शुक्रवारी उशिरा रात्री झालेल्या अपघातात केएसआरटीसी बस रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या एका लॉरी ट्र्कवर जाऊन धडकली.
Karnataka Yellapur Bus Accident
Karnataka Yellapur Accident Dainik Gomantak
Published on
Updated on

येल्लापूर तालुक्यातील मावळी क्रॉसजवळ शुक्रवारी उशिरा रात्री झालेल्या अपघातात केएसआरटीसी बस रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या एका लॉरी ट्र्कवर जाऊन धडकली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये बागलकोट येथील निलव्वा हरडोळी (४०) आणि जालीहाल गावातील गिरीजव्वा बुधन्नावर (३०) यांचा समावेश आहे. आणखी एक ४५ वर्षीय पुरुष मृत झाला असून त्याची ओळख पटलेली नाही. जखमींमध्ये दोन मुले (वय ७ व १२) यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीसांच्या माहितीनुसार, बागलकोटहून मंगळुरूकडे जाणारी केएसआरटीसी बस केरळमधील ऑपरेटरची लॉरी, जी रस्त्याच्या कडेला सूचक दिवे न लावता उभी करण्यात आली होती, तिच्यावर जाऊन धडकली. वेगात असलेली बस लॉरीच्या मागील भागावर जोरदार आदळली. प्राथमिक तपासानुसार, बसचालक दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात झाला असावा.

Karnataka Yellapur Bus Accident
Pushpa 2 Crew Accident: पुष्पा 2 च्या शूटींगच्या टीमचा बस अपघात...जखमी रुग्णालयात दाखल

पीडित हे सर्वजण कामानिमित्त मंगळुरूकडे जात होते. जखमींना तातडीने हुबळीतल्या केआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने बसचालक व वाहक यांना मोठी दुखापत झालेली नाही.

Karnataka Yellapur Bus Accident
Bogmalo Accident: भरधाव दुचाकीने दिली धडक, चालक उडून पडला रस्त्यावर; भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. मृतदेहांना येल्लापूर रुग्णालयाच्या शवागारात हलविण्यात आले आहे. बसचालक यमनप्पा मगी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या भीषण अपघातामुळे पुन्हा एकदा महामार्ग सुरक्षेचा प्रश्न, अवजड वाहनांचा बेफाम वेग आणि योग्य खबरदारी न घेता उभ्या करण्यात येणाऱ्या लॉऱ्या यांमुळे घडणाऱ्या जीवघेण्या अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com