SMAT 2025: टी-20 सामन्यात 432 धावा... इशान किशनच्या संघाचा ऐतिहासिक विजय, 'इतक्या' चेंडूत गाठलं लक्ष्य

Jharkhand registers highest successful run chase: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सुपर लीग टप्प्यात एक रोमांचक सामना झाला. पुण्यातील डीवाय पाटील स्टेडियमवर झारखंडने पंजाबविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला.
SMAT 2025
SMAT 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या सुपर लीग टप्प्यात एक रोमांचक सामना झाला. पुण्यातील डीवाय पाटील स्टेडियमवर झारखंडने पंजाबविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यात धावांचा पाऊस पाहायला. इशान किशनच्या नेतृत्वाखाली झारखंड संघाने सुपर लीग हंगामाची सुरुवात विजयाने केली आणि चार महत्त्वाचे गुण मिळवले. या सामन्यात झारखंडच्या अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली.

प्रथम फलंदाजी करताना पंजाबने सलील अरोराच्या शतकाच्या जोरावर २० षटकांत ६ बाद २३५ धावा केल्या. त्याने ३९ चेंडूत शतक केले आणि ४५ चेंडूत नाबाद १२५ धावा केल्या, ज्यामध्ये ९ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश होता. इतर कोणताही खेळाडू ३० धावांचा टप्पा गाठू शकला नाही. दरम्यान, झारखंडकडून सुशांत मिश्रा आणि बाल कृष्ण यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

SMAT 2025
Goa Nightclub Fire: बोगस कागदपत्रांद्वारे परवाने दिले कसे? समितीतर्फे तपास सुरू; लुथरा बंधूंचे मंगळवारी भारतात प्रत्यार्पण शक्य

पण हे लक्ष्य झारखंडसाठी खूपच लहान ठरले. झारखंडने केवळ १८.१ षटकांतच सामना जिंकला, फक्त चार विकेट्स गमावल्या. कुमार कुशाग्राची स्फोटक नाबाद खेळी आणि इशान किशनची दमदार सुरुवात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

इशान किशनने फक्त २३ चेंडूत ४७ धावा करत धावांचा पाठलाग सुरू केला. त्यानंतर कुमार कुशाग्राने ४२ चेंडूत नाबाद ८६ धावा करत सामना एकतर्फी लढतीत बदलला. त्याच्या खेळीत आठ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. अनुकुल रॉयने ३७ धावा आणि पंकज कुमारने ३९ धावा करून संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

SMAT 2025
South Goa Hotel Inspection: हडफडेच्या आगीचा धसका! दक्षिण गोव्यातील 15 हॉटेल्स-पब्जकडे NOC चं नाही, तपासणीत मोठा खुलासा

या सामन्यात दोन्ही संघांनी मिळून ४३२ धावा केल्या, जो टी२० क्रिकेटमधील एक दुर्मिळ कामगिरी आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या इतिहासातील हा सर्वाधिक धावांचा पाठलाग ठरला. झारखंडने २०२४ मध्ये आंध्र प्रदेशविरुद्ध २३० धावांचे लक्ष्य गाठत मुंबईचा विक्रम मोडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com