Jasprit Bumrah Angry: बुमराहचा पारा चढला! चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि फेकून दिला Watch Video

Jasprit Bumrah Angry Video: भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.
Jasprit Bumrah Angry
Jasprit Bumrah AngryDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. आपल्या अचूक यॉर्करसाठी प्रसिद्ध असलेला बुमराह मैदानाबाहेर एका चाहत्यावर भडकल्याची घटना विमानतळावर घडली आहे. चेक-इन रांगेत उभे असताना एका चाहत्याने बुमराहच्या संमतीशिवाय त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला, ज्याचा शेवट एका वादात झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेमकं घडलं काय?

विमानतळावर रांगेत उभे असताना एक चाहता बुमराहच्या अगदी जवळ जाऊन सेल्फी व्हिडिओ बनवत होता. बुमराहने सुरुवातीला त्याला मज्जाव केला आणि कॅमेरा बंद करण्यास सांगितले. मात्र, तो चाहता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. "मी तुमच्यासोबतच येणार सर," असे म्हणत तो चित्रीकरण करतच राहिला. यावर बुमराहने त्याला गंभीर इशारा दिला की, "जर तुझा फोन खाली पडला तर मला बोलू नकोस." या शाब्दिक इशाऱ्यानंतरही चाहता न थांबल्याने संतापलेल्या बुमराहने त्याच्या हातातील फोन हिसकावून बाजूला फेकून दिला.

Jasprit Bumrah Angry
Goa Nightclub Fire: प्रकृती इतकी गंभीर होती तर विदेशात पळून का गेलात? लुथरांविरोधात सरकारी वकिलांचा युक्तिवाद

या घटनेनंतर इंटरनेटवर क्रिकेट चाहत्यांमध्ये दोन गट पडले आहेत. अनेक युझर्स बुमराहच्या या वर्तणुकीवर टीका करत आहेत. एका स्टार खेळाडूला अशा प्रकारे राग अनावर होणे शोभत नाही, असे काहींचे म्हणणे आहे. दुसरीकडे, बुमराहच्या समर्थकांनी असा युक्तिवाद केला आहे की, खेळाडूंचेही वैयक्तिक आयुष्य आणि 'प्रायव्हसी' असते; परवानगीशिवाय व्हिडिओ बनवणे चुकीचे आहे.

Jasprit Bumrah Angry
Goa Politics: मनोज परब यांच्‍यामुळेच युती झाली नाही! काँग्रेस–फॉरवर्ड युतीला जनता स्‍वीकारणार - माणिकराव ठाकरे

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारत आघाडीवर

एकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत व्यस्त आहे. कटक येथील पहिल्या सामन्यात बुमराहने १७ धावांत २ बळी घेत चमकदार कामगिरी केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. वैयक्तिक कारणांमुळे तो तिसऱ्या सामन्याला मुकली होता, तर चौथा सामना धुक्यामुळे रद्द झाला. सध्या भारत या मालिकेत २-१ ने आघाडीवर असून, मालिकेचा शेवटचा आणि निर्णायक सामना १९ डिसेंबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com