Goa Nightclub Fire: प्रकृती इतकी गंभीर होती तर विदेशात पळून का गेलात? लुथरांविरोधात सरकारी वकिलांचा युक्तिवाद

Goa Nightclub Fire Update: जोरदार युक्तिवाद राज्य सरकारकडून साहाय्यक सरकारी वकील तेजस पवार यांनी बुधवारी म्हापसा न्यायालयात केला.
Goa Nightclub Fire
Goa Nightclub FireDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: हडफडे येथील दुर्घटनेवेळी पोलिस व अग्निशमन यंत्रणा पीडितांसाठी बचावकार्य राबवत होती, तेव्हा संशयितांनी दुर्घटनेच्या दीड तासांतच मध्यरात्री १.१७ वाजता पलायनाच्या इराद्याने थायलंडसाठी तिकिट बूक केले होते. हा प्रकार भावनाशून्य तसेच धक्कादायक होता.

संशयिताने आपणास पोलिस कोठडी नको, अशी मागणी केली. कारण पाठदुखी. मग इतकी आरोग्याची गंभीर समस्या होती तर आंतरराष्ट्रीय विमानाने इतके अंतर कापून विदेशात (थायलंडला) पळून का गेले? असा जोरदार युक्तिवाद राज्य सरकारकडून साहाय्यक सरकारी वकील तेजस पवार यांनी बुधवारी म्हापसा न्यायालयात केला.

Goa Nightclub Fire
Goa Crime: काळजाचा थरकाप उडवणारी घटना! वाळपईत महिलेचं अपहरण करुन नराधमानं केलं निंदनीय कृत्य

नक्की कोणाच्या संगनमताने दोघेही लुथरा बंधू वैध परवान्यांशिवाय बर्च क्लब आवारात व्यवसाय चालवत होते, त्या त्यांच्या साथीदारांचा शोध घेण्यासाठी संशयित लुथरा बंधूंची पोलिस कोठडी गरजेची आहे, असेही सरकारी वकिलांनी सांगितले.

संशयित सौरभ व गौरव लुथरा या बंधूंची पोलिस कोठडी मागण्यासाठी हणजूण पोलिसांनी बुधवारी, दोघांना म्हापसा जेएमएफसी कोर्टात उभे केले होते. यावेळी दोघेही संशयित आपण आरोग्याच्या समस्याने त्रस्त आहोत, असा वारंवार बचावाचे युक्तिवाद करीत; आम्हाला पोलिस कोठडी देवू नये अशी विनंती करीत होते. आम्ही पोलिस चौकशीत सहकार्य करू, अशी विनंती बचावपक्षाने न्यायालयाकडे केली.

1 ज्यात २५ निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे संशयितांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी आमची मागणी आहे. संशयितांना जामिनासाठी अर्ज केल्यास त्यालाही आम्ही विरोध करू. मुळात संशयित व त्यांचे भागीदार वैध परवान्यांशिवाय क्लब चालवत होते.

2. कुठल्या सरकारी यंत्रणा व अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केला आणि या भ्रष्टाचारात कोणकोण सहभागी होते. याची सखोल चौकशी झाली पाहिजे. या सर्वांची सरकारी बाबूंची नावे उघडकीस आली पाहिजेत व त्यांच्याविरुद्ध देखील आरोपपत्र दाखल झाले पाहिजे. तसेच सध्याच्या गोवा पोलिसांच्या तपासावर अ‍ॅड. जोशी यांनी समाधान व्यक्त केले.

Goa Nightclub Fire
Goa Politics: निवडणुकीपूर्वी भाजपची 'युवा' भरती! पर्वरीत 100 तरुणांचा जाहीर प्रवेश; पर्यटनमंत्री खंवटेंनी फुंकले विजयाचे रणशिंग

सरकारी वकिलांचा युक्‍तिवाद

१. संशयित आरोपींची पोलिस कोठडीत चौकशी करण्यासाठी त्यांची कोठडी आवश्यक आहे. जेणेकरून संशयितांच्या साथीदारांची भूमिका, निर्णय प्रक्रिया, आर्थिक बाबीं, कार्यक्रमांच्या परवानग्या व इतर भागीदार, व्यवस्थापक व आयोजकांच्या सहभाग निश्चित करता येईल.

२. त्याचप्रमाणे, कागदपत्रे, डिजिटल पुराव्यांची जप्ती करायची आहे. तसेच व्यवसायाशी संबंधित बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी वापरलेली उपकरणे हस्तगत करायची आहेत. तसेच संशयितांच्या साथीदार व गुन्ह्यात वापरलेली उपकरणे मिळवण्याचा स्त्रोत शोधायचा आहे.

३. संशयितांना पोलिस कोठडी नाकारल्यास, संशयित हे पुराव्यांशी छेडछाड व इतर मौल्यवान पुरावे नष्ट करु शकतात. या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे व त्याचा सार्वजनिक सुरक्षा व सार्वजनिक विश्वासावर गंभीर परिणाम झाला आहे.

४. संशयित व त्यांच्या साथीदारांना देशाबाहेर पळून जाण्यापासून रोखण्यासाठी संशयितांची कोठडी आवश्यक आहे.

बर्च दुर्घटनेत दिल्लीतील जोशी कुटुंबीयांचे चौघेजण मृत्युमुखी पडले होते. या पीडित कुटुंबीयांच्या वतीने, वकील विष्णू जोशी यांनीही म्हापसा कोर्टात आपले लेखी म्हणणे मांडले. तसेच लुथरा बंधूंना पोलिस कोठडी द्यावी व त्यांना कोणतीही विशेष सवलत देऊ नये, अशी मागणी लावून धरली. अ‍ॅड. विष्णू जोशी म्हणाले की, बर्च दुर्घटना हा एक नरसंहार होता.

दोघेही थेट जबाबदार : लुथरा बंधू हे आस्थापनाचे मालक व भागीदार असल्याने त्यांचे व त्यांच्या साथीदारांचे आस्थापनेतील कामकाज, सुरक्षा व्यवस्था, परवानग्या व कार्यक्रमांवर अंतिम नियंत्रण होते. परिणामी, दोघेही बेकायदेशीर कृत्ये व चुकांसाठी थेट जबाबदार आहेत. वैधनिक परवानग्याशिवाय संशयित व्यवसाय चालवत होते, असेही राज्य सरकारने आज न्यायालयासमोर सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com