
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानचा ८८ धावांनी पराभव केला आहे. टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध सलग १२ वा एकदिवसीय सामना जिंकला आहे. भारताच्या २४८ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १५९ धावांवर गारद झाला. पाकिस्तानकडून सिद्रा अमीनने एकट्याने ८१ धावा केल्या, पण दुसऱ्या विकेटवर तिला साथ मिळाली नाही. दरम्यान, टीम इंडियाकडून दीप्ती शर्मा आणि क्रांती गौरने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या, तर स्नेह राणा यांनी दोन विकेट घेतल्या.
भारताच्या २४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. त्यांनी फक्त २६ धावांत तीन विकेट गमावल्या. मुनीबा अली (२), सदाफ शमास (६) आणि आलिया रियाज (२) धावांवर बाद झाल्या.
त्यानंतर सिद्रा अमीन आणि नतालिया परवेझ यांनी चौथ्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली, परंतु नतालिया परवेझ बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ कोसळू लागला. नतालियाने ४६ चेंडूत ३३ धावा केल्या. त्यानंतर सिद्रा नवाजने १४ धावा केल्या.
सिद्रा अमीन शेवटपर्यंत टिकून राहिली, पण तिला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. पाकिस्तानचा संपूर्ण संघ १५९ धावांवर ऑलआउट झाला. सिद्रा अमीनने १०६ चेंडूत ८१ धावांची खेळी केली.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघ २४७ धावांवर ऑलआउट झाला. हरलीन देओलने ६५ चेंडूत ४६ धावा केल्या. रिचा घोषने २० चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या. प्रतिका रावलने ३७ चेंडूत ३१ धावा केल्या.
जेमिमा रॉड्रिग्जने ३७ चेंडूत ३२ धावा केल्या आणि दीप्ती शर्माने ३३ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. पाकिस्तानकडून डायना बेगने ४ बळी घेतले. सादिया इक्बाल आणि कर्णधार फातिमा सना यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. तर नशरा संधू आणि रमीन शमीम यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.