पोलीस बाहेर ओरडत राहिले अन् चोरट्यांनी अवघ्या 4 मिनिटांत रीकामी केली Axis Bank

Bihar News: दरोड्यादरम्यान दरोडेखोरांनी व्यवस्थापकाला मारहाणही केली आणि कॅन्टीनमधील सर्व कर्मचाऱ्यांना कोंडून घातले. पोलीस पोहोचेपर्यंत गुन्हेगार पळून गेले होते.
Axis Bank Roberry Bihar
Axis Bank Roberry BiharDainik Gomantak
Published on
Updated on

In Bihar, robbers looted 16 lakh rupees from Axis Bank in just 4 minutes:

बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील एका बँकेत बुधवारी दरोड्याची विचित्र घटना घडली असून, दरोडेखोरांनी आत्मसमर्पण करावे यासाठी पोलिसांनी बँकेबाहेर आरडाओरडा केला. पण त्याआधीच बँकेतून 16 लाख रुपये लुटून दरोडेखोर फरार झाले.

वास्तविक, हे प्रकरण आराह येथील सर्किट हाऊस रोडवरील Axis Bank च्या शाखेचे आहे, दरोडेखोरांनी सुमारे 16 लाख रुपये लुटून पलायन केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पाच दरोडेखोरांनी शस्त्रांसह Axis Bank मध्ये प्रवेश केला आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना एका खोलीत बंद केले. यानंतर काउंटरवर ठेवलेले सुमारे 16 लाख रुपये घेऊन चार मिनिटांतच ते पळून गेले.

Axis Bank Roberry Bihar
बलात्काराचे खोटे गुन्हे दाखल करण्याचा बनतोय 'ट्रेंड'; तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी...

दरम्यान, गुन्हेगार बँकेत असल्याची माहिती कोणीतरी फोनवरून दिली. त्यावर पोलिसांनी बँकेला घेराव घातला आणि गुन्हेगारांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले.

मात्र, या गोंधळातच चोरटे पळून गेले होते. त्यानंतर पोलीस बँकेत दाखल झाले आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना खोलीबाहेर काढण्यात आले.

Axis Bank Roberry Bihar
Goa Tourism: ख्रिसमस, न्यू ईयरच्या पार्ट्यांसाठी गोव्यातील हॉटेल्स सज्ज; 15 डिसेंबरपासून वाढणार पर्यटकांची संख्या

मिळालेल्या माहितीनुसार, दरोड्यादरम्यान दरोडेखोरांनी व्यवस्थापकाला मारहाणही केली आणि कॅन्टीनमधील सर्व कर्मचाऱ्यांना कोंडून घातले. पोलिस पोहोचेपर्यंत गुन्हेगार पळून गेले होते.

बँकेत जाण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी एकच मार्ग आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, गुन्हेगारांनी बँक कर्मचाऱ्यांना एका खोलीत बंद करून कॅश काउंटरवर ठेवलेले सुमारे १६ लाख रुपये घेऊन पळ काढल्याचे दिसून आले.

पोलीस आता दरोडेखोरांच्या मागावर असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com