Sangolda: दारूच्या नशेत पोलिस ‘झिंगाट’, बार काउंटरवर फेकले जेवण

निलंबित पोलिसांचा प्रताप
drunk police
drunk police Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: सांगोल्डा (Sangolda) येथील ‘किस्मूर सांगोल्डा’ या रेस्टॉरंटमध्ये पार्टी केल्यानंतर कथित बिलावरून धिंगाणा घालणाऱ्या पोलिसांना चांगलेच महागात पडले आहे. मद्य प्राशनानंतर पोलिसांनी रेस्टॉरंट मालकाला शिवीगाळ तसेच धमकी दिल्याप्रकरणात, पोलिस खात्याने या आठ बेशिस्त पोलिसांना निलंबित केले आहे.

या आठ निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांनी धिंगाणा घातला. या शिवाय अधिक बिल झाल्याचा दावा करीत, या निलंबित पोलिसांनी रेस्टॉरंट मालकाशी वाद घातला आणि मालकासहीत कर्मचाऱ्यांना अर्वाच्च शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याशिवाय धमकीही दिली. त्याचप्रमाणे एकाने त्यांच्या टेबलवरील भाकरी असलेले बास्केट बार काउंटरच्या दिशेने भिरकावून मारले. सदर प्रकार हा मंगळवारी (ता.२६ जुलै) रात्री ९.३० ते १०.३०च्या दरम्यान, घडला.

drunk police
Revolutionary Goans : आपच्या अमित पालेकरांना आरजीचे सल्ले

त्यांनी मांसाहार जेवणासोबतच पेंट बिअरच्या ३२ बाटल्या मागविल्या. या बिअरच्या बाटल्या फस्त करीत, चिकन, फ्राइड सुंगटा, रोटीवर त्यांनी ताव मारला. नंतर बिल देण्यावरुन या पोलिसांनी रेस्टॉरंट कर्मचारी तसेच मालकाशी हुज्जत घातली. आम्ही पैसेच देणार नाही, तुम्हांला हवे ते करा. आमची ओळख वरपर्यंत असून, तुम्हांला आमचा इंगा दाखवतो.

सदर प्रकार सुरू झाल्याने, रेस्टॉरंटमधील इतर ‘गेस्ट’ही थोडेसे घाबरले. काहीजण बाजूला एका कोपऱ्यात जाऊन थांबले.

दरम्यान, हॉटेल मालकांनी संयम दाखवत या पोलिसांना बरेच समजावण्याचा प्रयत्न करीत, त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला. मात्र, नशेत तर्रात असलेले हे पोलिस ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. या आठ पोलिसांसोबत अन्य दोघे त्यांचे मित्र मिळून दहाजणांचा गट त्यादिवशी रेस्टॉरंटमध्ये आलेला. सदर प्रकारानंतर रेस्टॉरंट मालकांनी साळगाव पोलिस स्थानकात याची माहिती दिली.

drunk police
राजीनामा द्या, मगच पक्षांतर करा

उर्मट पोलिसांची गरज आहे का?

मुळात पोलिस असल्याने आम्हीच श्रेष्ठ असून आम्हीच कायदा आहोत, त्यामुळे आम्हास कायदा लागत नाही, असे त्यांनी रेस्टॉरंट मालकास सांगण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे असे पोलिस किंवा अधिकारी हे खाकी वर्दीत शोभत नाहीत. अशा उर्मट पोलिसांची समाजाला व पोलिस खात्याला खरीच गरज आहे का? असा सवाल या प्रकारानंतर विचारला जातोय.

माफीची मागणी

निलंबित केल्यानंतर या पोलिसांची दारूची झिंग आता उतरल्याची दिसते. काहीजण रेस्टॉरंटच्या मालकांना येऊन भेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातील एकाने आपल्या पत्नीसोबत येऊन मालकासमोर आपली चूकही कबूल केली. आपली चूक झाली असून मला माफ करा, अशी विनंती तो करीत होता.

किळसवाणा प्रकार...

उर्मट तथा निलंबित पोलिसांनी रेस्टॉरंटमध्ये चिकन, सुंगटा, ३२ बिअरच्या बाटल्या तसेच एक चिकन बिर्याणी पार्सल घेतली होती. याचे बिल एकूण ८ हजार रुपये झाले. मात्र, जादा बिल काढल्याचा कथित दावा करीत सदर पोलिसांनी गोंधळ घालत तमाशा सुरू केला. हे पोलिस आपल्या तीन वैयक्तिक चारचाकीमधून रेस्टॉरंटमध्ये आले होते. रेस्टॉरंटमध्ये आल्यापासून त्यांचा गोंधळ सुरुच होता. यातील एक पोलिस ऑनड्यूटी होता, असे समजते. बिलावरून जवळपास १५ ते २० मिनिटे या पोलिसांनी हा तमाशा केला. रेस्टॉरंटमधील धिंगाणापासून त्यांनी केलेले सर्व प्रताप हे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.

drunk police
Goa Zuari Bridge Accident : अमित पालेकरांची गोवा सरकारवर जोरदार टीका, म्हणाले...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com