Khandepar Bridge CCTV : ‘सीसीटीव्ही’द्वारे कचराफेकूंवर नजर! खांडेपार पंचायतीकडून कार्यवाही

Khandepar Bridge CCTV : खांडेपारच्या दोन्ही पुलांवरील कॅमेरे ठरताहेत उपयुक्त
CCTV cameras deployed on Khandepar bridge.
CCTV cameras deployed on Khandepar bridge.Dainik Gomantak
Published on
Updated on

Khandepar Bridge CCTV : पाळी, राज्यातील प्रमुख नद्या सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्या असून त्यात खांडेपार व म्हादई नदीतही कचरा टाकण्याचे प्रकार वाढल्याने त्यांना रोखण्याची आवश्‍यकता आहे.

दरम्यान, खांडेपारच्या दोन्ही पुलांवर कुर्टी - खांडेपार पंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे सध्या तरी या नदीत कचरा फेकणाऱ्यांवर आणि नवीन पुलावर रात्रीच्या वेळी चालणाऱ्या पार्ट्यांवर निर्बंध आले आहेत. विशेष म्हणजे चोऱ्या करून पळणाऱ्यांचा मागोवाही या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे लागणे शक्य झाले आहे.

खांडेपार व म्हादई नदीतील वाढते प्रदूषण चिंताजनक ठरले आहे. आधीच या नद्यांच्या कडा कोसळण्याचे प्रकार होत असून नद्यांची पात्रेही रूंदावत चालली आहेत.

त्यातच नदीच्या पात्रात कचरा फेकण्याचे प्रकार सातत्याने घडत होते, त्यावर निर्बंध घालण्याची मागणी ग्रामस्थांनी पंचायतीकडे केली होती, त्यानुसार पंचायतीने खांडेपार नदीच्या नव्या व जुन्या पुलावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे सध्या तरी कचरा टाकला जात नाही, तरीपण नद्यांच्या प्रदूषणावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची आवश्‍यकता व्यक्त करण्यात येत आहे.

CCTV cameras deployed on Khandepar bridge.
Goa Highways: गोवा सरकारने रस्त्यांसाठी मागितले 7000 कोटी; केंद्र सरकारने दिले केवळ 110 कोटी रूपये

पंचायतीचे अभिनंदन

कुर्टी - खांडेपार पंचायतीने खांडेपारच्या जुन्या व नव्या अशा दोन्ही पुलांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा विषय मागच्या ग्रामसभांत बराच काळ गाजला होता.

त्यातच यापूर्वीचे सीसीटीव्ही कॅमेरे चालत नसल्याने सगळा पैसा पाण्यात गेल्या जमा झाला होता. मात्र आता पंचायतीने पुलावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पुलावरील अंदाधुंदीला आळा घालण्यास मदतच केली आहे.

रात्रीच्यावेळी अंदाधुंदी...

खांडेपारच्या नवीन पुलावर रात्रीच्यावेळी सुरू असलेली अंदाधुंदी रोखण्यात सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे ठरले आहेत. खांडेपार पुलाच्या कुर्टी भागाकडील जोडरस्ता गेली साडेचार वर्षे केला नव्हता.

त्यामुळे या काळात रस्त्यावर रात्रीच्यावेळी दारुच्या पार्ट्या झोडल्या जाऊ लागल्या. दारू पिऊन बाटल्या फोडण्याचे प्रकारही घडले होते. सीसीटीव्ही बसवल्यामुळे पार्ट्यांवर निर्बंधही आले आहेत.

परराज्यातील चालकांकडून अपघात

खांडेपार भागात परराज्यातील वाहनचालकांकडून सर्वांत जास्त अपघात होत आहेत. मागच्या काळात खांडेपार बाजारात कर्नाटकातील वाहने उलटण्याचे प्रकारही घडले आहेत.

या भागातील रस्त्यासंंबंधीची माहिती परराज्यातील चालकांना नसल्याने सातत्याने हे अपघात होत आहेत. भरधाव वाहने हाकण्याबरोबरच दारू पिऊन वाहने चालवण्याचे प्रकारही होत असल्याने फोंडा ते उसगाव मार्गावर कायम अपघात होत आहेत.

वास्तविक नद्या म्हणजे गोव्याच्या जीवनदायिनी आहेत, पण या नद्यांत कचरा फेकण्याबरोबरच सांडपाणी सोडण्याचे प्रकार होत असल्याने नद्यांचे पाणी प्रदूषित झाले आहे. हे रोखण्यासाठी सरकारने प्रभावी उपाययोजना करण्याची खरी गरज आहे.

- रामकृष्ण जनार्दन नाईक, खांडेपार

सीसीटीव्ही कॅमेरे सध्या महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. एखाद्या ठिकाणी चोरी झाली तरी सीसीटीव्हीमुळे चोरट्यांना जेरबंद केले जाऊ शकते, त्यामुळे पंचायतीने खांडेपार पुलावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे पंचायतीचे आधी अभिनंदन करायला हवे.

- विश्‍वास शिवा गावकर, तिस्क- उसगाव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com