Goa Tourism: ख्रिसमस, न्यू ईयरच्या पार्ट्यांसाठी गोव्यातील हॉटेल्स सज्ज; 15 डिसेंबरपासून वाढणार पर्यटकांची संख्या

पर्यटन विभाग, हॉटेल मालक, शॅक ओनर्सना विश्वास
Goa Tourism:
Goa Tourism:Dainik Gomantak

Goa Tourism: पुढील आठवड्यापासून गोव्यात पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे, असे एका उद्योग प्रतिनिधीने बुधवारी सांगितले.

दरम्यान, गोव्यातील हॉटेल्स आणि भोजनालये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या आसपास रात्रभर चालणाऱ्या पार्ट्यांसाठी सज्ज झाली आहेत. पीटीआयने हे वृत्त दिले आहे.

गोवा ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन (TTAG) चे अध्यक्ष नीलेश शाह यांनी सांगितले की, “15 डिसेंबरपासून ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी गोव्यात पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागतील. तेव्हा पर्यटकांची संख्या या पर्यटन हंगामातील शिखरावर पोहोचेल.

Goa Tourism:
Michael Douglas: गोव्यानंतर हॉलीवूडचे स्टार कपल मायकल डग्लस, कॅथरीन झेटा-जोन्स हिंदू मंदिरांच्या प्रेमात...

सध्या गोव्यात देशांतर्गत पर्यटकांची संख्या चांगली दिसत असली तरी जगातील काही देशांतील युद्ध परिस्थिती लक्षात घेता आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आगमनाबाबत शंका आहेत.

पण तरीही आम्हाला आशा आहे की चार्टर्ड फ्लाइट्सला चांगला व्यवसाय मिळेल आणि काही परदेशी पर्यटक नियोजित (नियमित) फ्लाइटने गोव्यात येतील, असेही ते म्हणाले.

राज्याच्या पर्यटन विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, समुद्रकिनाऱ्यावर शॅक उभारण्यात आले असून राज्य पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. नाताळ आणि नवीन वर्षाचा हंगाम गोवा राज्यासाठीही उज्ज्वल आहे.

समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची झुंबड उडते. त्यामुळेच आम्ही अभ्यागतांना सुरक्षित राहण्याचा सल्ला देतो.

Goa Tourism:
Dona Paula Jetty: जुन्या दोना पावला जेट्टीची GTDC करणार पुनर्बांधणी अन् दुरूस्ती; 7.5 कोटी रूपये खर्च

शॅक ओनर्स वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष क्रुझ कार्डोसो म्हणाले की, दक्षिण गोवा जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ तुलनेने कमी आहे.

समुद्रकिनारी शॅक उभारण्यात विलंब झाल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. शॅक मालकांना ख्रिसमस-नवीन वर्षाच्या आठवड्यात चांगला व्यवसाय होण्याची आशा आहे.

कोलवा, बाणावली, माजोर्डा, उत्तोर्डा, पाळोले आणि अगोंडा हे समुद्रकिनारे दक्षिण गोव्यात आहेत, तर उत्तर गोव्यात हे कळंगुट, बागा, हरमल, आश्वे, हणजुण आणि मोरजी हे किनारे नाईटलाईफसाठी प्रसिद्ध आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com