ICC Ranking: स्मृती मानधनाची बादशाही संपली! दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ड्टची अव्वल स्थानी झेप, जेमिमाची गरुडझेप

ICC Latest Women’s Ranking: भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने आपल्या कारकिर्दीत प्रथमच आयसीसी महिला टी-२० गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावून इतिहास रचला आहे.
ICC Latest Women’s Ranking
ICC Latest Women’s RankingDainik Gomantak
Published on
Updated on

भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माने आपल्या कारकिर्दीत प्रथमच आयसीसी महिला टी-२० गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावून इतिहास रचला आहे. मात्र, दुसरीकडे एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये स्टार फलंदाज स्मृती मंधानाला आपले पहिले स्थान गमवावे लागले असून दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ड्टने पुन्हा एकदा नंबर-१ वर कब्जा केला आहे.

दीप्ती शर्मा अव्वल स्थानी

विशाखापट्टणम येथे श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात दीप्ती शर्माने अत्यंत किफायती गोलंदाजी केली. तिने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात केवळ २० धावा देत १ बळी घेतला. या कामगिरीमुळे तिला ५ महत्त्वाचे रेटिंग पॉइंट्स मिळाले, ज्यामुळे तिने ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँडला मागे टाकले.

ऑगस्ट महिन्यापासून सदरलँड या स्थानावर होती, परंतु आता केवळ एका पॉईंटच्या फरकाने दीप्तीने जागतिक क्रमवारीत पहिले स्थान काबीज केले आहे. याच सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणारी भारताची अरुंधती रेड्डी देखील ३६ व्या स्थानावर पोहोचली आहे.

ICC Latest Women’s Ranking
Goa ZP Election Result: युती फिस्कटल्याने विरोधकांना 7 मतदारसंघांत फटका! 21 जागा जिंकण्याची गमावली संधी; 14 जागांवर समाधान

जेमिमा रॉड्रिग्सची टॉप-१० मध्ये एन्ट्री

टी-२० फलंदाजीच्या क्रमवारीत भारताच्या जेमिमा रॉड्रिग्सने मोठी झेप घेतली आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावणाऱ्या जेमिमाची ५ स्थानांनी प्रगती झाली असून ती आता ९ व्या क्रमांकावर पोहोचली आहे. या विजयामुळे भारतीय संघातून स्मृती मंधाना (तिसरे स्थान), जेमिमा रॉड्रिग्स (नवे स्थान) आणि शफाली वर्मा (दहावे स्थान) अशा तीन खेळाडू आता जगातील पहिल्या दहा फलंदाजांच्या यादीत सामील झाल्या आहेत.

ICC Latest Women’s Ranking
Goa Nightclub Fire: 'आम्ही तपासात सहकार्य करू'! बर्च क्लबप्रकरणी सौरभ लुथराची कबुली; संशयित अजय गुप्ताची कारागृहात रवानगी

मानधनाची घसरण

एकदिवसीय क्रिकेटच्या क्रमवारीत मात्र भारतीय चाहत्यांसाठी थोडी निराशा झाली आहे. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टने आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत सलग दोन शतके झळकावत खळबळ माजवून दिली. तिच्या या तुफानी कामगिरीमुळे तिने स्मृती मंधानाला दुसऱ्या स्थानावर ढकलून स्वतः पुन्हा एकदा अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

वोल्वार्ड्टने आतापर्यंतच्या तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग रेटिंग मिळवले आहे. दक्षिण आफ्रिकेची सुने लुस हिने देखील फलंदाजी आणि अष्टपैलू कामगिरीत मोठी प्रगती केली आहे. आयर्लंडच्या आर्लेन केली आणि गॅबी लुईस यांनीही पराभवानंतरही आपल्या क्रमवारीत सुधारणा केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com