मी पंजाबचा मुख्यमंत्री आहे, दहशतवादी नाही. मला कॉंग्रेस पक्षाचा प्रचार करण्यापासून रोखले जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी होशियारपूरमध्ये सोमवारी आयोजित राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाण करू दिले नाही.
पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी पंजाबमध्ये (Punjab) 'नो फ्लाइंग झोन' घोषित करण्यात आला. परिणामी चन्नी यांच्या हेलिकॉप्टरला उड्डानाची परवानगी देण्यात आली नाही. यावर भाष्य करताना चन्नी म्हणाले, राजकारणामुळे माझे हेलिकॉप्टर उडू दिले जात नाही. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे नो-फ्लाय झोन घोषित करून मला होशियारपूरला जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. होशियारपूरमध्ये राहुल गांधींच्या सभेला मी उपस्थित राहू शकलो नाही.
दरम्यान, हेलिकॉप्टरचे उड्डाण रोखून धरल्याने चरणजीत चन्नी चांगलेच आक्रमक झाले. परिणामी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. पंजाब मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
कॉंग्रेसचे (Congress) सुनील जाखड यांनी होशियारपूरच्या सभेत आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले, मुख्यमंत्री येथे येणार होते, मात्र त्यांची परवानगी रद्द करण्यात आली. निवडणूक आयोगाने याची दखल सुद्धा घेतली नाही.
जालंधरच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वादाचा उल्लेख केला. मोदी म्हणाले की, जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि भाजपने त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार केले होते, तेव्हा पठाणकोटहून हिमाचलला प्रचारासाठी जात असताना त्यांचे हेलिकॉप्टर थांबवण्यात आले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.