Weather Updates: मध्य भारतात पावसासह बर्फवृष्टी होण्याची शक्यता

दुसरीकडे, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुधवारपर्यंत बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे
Weather Updates
Weather UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

हवामानात पुन्हा बदलत होत आहे. हवामान खात्याने (IMD) आज जारी केलेल्या बुलेटिननुसार, येत्या दोन दिवसांत संपूर्ण वायव्य भारतात रात्रीचे तापमान 2 ते 4 अंशांनी वाढण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मध्य भारतात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचीही शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे. (Weather Updates Today)

दुसरीकडे, जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बुधवारपर्यंत बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. IMD नुसार, पश्चिमेकडील वाऱ्यांमुळे हवामानात बदल होणार आहे. कुठेतरी पाऊस असेल तर कुठे बर्फवृष्टी होण्याचा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे.

Weather Updates
"युवराजने 2014 मध्ये माझे हेलिकॉप्टर थांबवले": PM मोदींनी राहुल गांधींवर साधला निशाणा

भारतीय हवामान विभागाच्या मते, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे बुधवारपर्यंत जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आणि पीओकेच्या गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबादमध्ये हलका पाऊस किंवा हिमवृष्टीची शक्यता आहे. त्याच वेळी, आणखी एका वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, गुरुवार ते रविवार पश्चिम हिमालयीन भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, तटीय तमिळनाडूवर उत्तर-पूर्वेकडील वाऱ्यांमुळे, पुढील तीन ते चार दिवसांत दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ आणि लक्षद्वीपमध्ये पावसाची शक्यता आहे.

Weather Updates
सायरस पूनावाला यांना आंतरराष्ट्रीय बिझनेस समिटमध्ये केले गेले सन्मानित

यंदा फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत देशात थंडीचा प्रभाव कायम आहे. देशातील उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये अनेक दिवस थंडीची लाट कायम होती. अनेकवेळा वेस्टर्न डिस्टर्बन्स देखील अपेक्षित होते, त्यामुळे पाऊस आणि थंडी मिळून देशात थंडीचा जास्त कहर बघायला मिळाला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून देशाच्या बहुतांश भागात ऊन पडत असून दिवसाबरोबरच रात्रीचे तापमानही वाढू लागले आहे. पुढील दोन दिवस पूर्व भारतातील हवामानही आल्हाददायक राहण्याचा अंदाज आहे. मात्र ओडिशाच्या काही भागातच थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com