

गंगाराम आवणे
पणजी: गोव्यात सर्वसाधारणपणे ३ हजार मिमी (११८ इंच) पाऊस झाला की तो सामान्य मानला जातो. मात्र, यंदा आतापर्यंत राज्यात केवळ ८१ इंच पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या तुलनेत ३१.५ टक्के पावसाचा तुटवडा आहे.
गोवा वेधशाळेच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, १९८० नंतरचा हा सर्वाधिक पावसाचा तुटवडा असल्याचे वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी यांनी सांगितले. यापूर्वी २००६ मध्ये २९ टक्के, १९८६ मध्ये २३ टक्के आणि २००१ मध्ये १६ टक्के पावसाचा तुटवडा नोंदविला गेला होता. यंदाच्या तुटवड्याने या वर्षांतील आकडे मागे टाकले आहेत.
‘एनआयओ’चे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. एम. रमेशकुमार यांच्या मते, यंदा गोव्यात सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी झाला आहे. ऑक्टोबरमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, याची शाश्वती नाही. ईशान्य मान्सूनच्या प्रभावामुळे काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता असली तरी त्याचे प्रमाण कमी राहू शकते. पाऊस कमी झाल्याने आर्द्रता वाढणे आणि उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव कमी होणे, यामुळे ऑक्टोबरमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू शकते. त्यामुळे यंदा ‘ऑक्टोबर हिट’चा प्रभाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पर्जन्य कमी होण्यामागची कारणे
यंदा एल-निनोच्या प्रभावामुळे मान्सूनची गती मंदावली.
अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे तुलनेने कमी प्रमाणात निर्माण झाले.
उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव कमी राहिला. चक्रीय वाऱ्यांची स्थितीही कमी प्रमाणात होती.
देशभरात यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.