Viral Video: "मीच खरा मोगली" म्हणत पठ्ठ्याचा सापाशी पंगा, डंक मारताच हुसेन बोल्टसारखा सुस्साट; नेटकरी म्हणाले, 'एका झटक्यातच जिरली'

Dangerous Snake Stunt Video: आजकाल लोकांमध्ये चर्चेचा विषय बनण्यासाठी किंवा सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुण पिढी अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घालताना दिसते.
Dangerous Snake Stunt Video:
Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

Surat Snake Bite Viral Video: आजकाल लोकांमध्ये चर्चेचा विषय बनण्यासाठी किंवा सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुण पिढी अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घालताना दिसते. काही वेळा हे धाडस त्यांच्या अंगाशी येते आणि त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. सध्या इंटरनेटवर असाच एक धक्कादायक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक तरुण लोकांसमोर 'हिरो' बनण्याच्या नादात सापाशी पंगा घेताना दिसत आहे. मात्र, त्याची ही 'हवाबाजी' काही सेकंदांतच त्याच्यावर उलटली आणि सापाने त्याला चांगलाच धडा शिकवला.

नेमकी घटना काय?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण वस्तीतील एका घराबाहेर उभा असलेला दिसतो. सुरुवातीला त्याने हातात काय पकडले आहे हे नीट समजत नाही, पण काही वेळातच तिथला सगळा प्रकार स्पष्ट होतो. त्या तरुणाने एका सापाची शेपटी पकडलेली असते आणि तो त्याला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. साप पकडण्याचा कोणताही पूर्वअनुभव नसतानाही तो तरुण काही वेळ त्या सापावर ताबा मिळवतो. मात्र, जेव्हा तो सापाला हातामध्ये पकडून धावू लागतो, नेमकी याच वेळी सापाने (Snake) त्याच्या पायाचा घट्ट चावा घेतला. सापाने चावताच तो तरुण सापाला तिथेच सोडून जीव वाचवण्यासाठी पळताना दिसतो.

Dangerous Snake Stunt Video:
Viral Video: टिनशेड वाचवायला गेला अन् 50 फूट उंच हवेत उडून शेतात कोसळला, बरेलीतील थरार व्हायरल; व्हिडिओ पाहून नेटकरी अचंबित

तरुणाची ओळख आणि सुदैवाने वाचला जीव

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ गुजरातमधील सुरत येथील आहे. सापाशी अशी स्टंटबाजी करणाऱ्या या तरुणाचे नाव सचिन असल्याचे सांगण्यात येत आहे. सचिनला साप पकडण्याचा कोणताही अनुभव नव्हता, तरीही तो हे धाडस करत होता. सुदैवाने तो साप विषारी नव्हता, ज्यामुळे सचिनचा जीव वाचला, अन्यथा ही मस्ती त्याच्या जीवावर बेतू शकली असती. हा संपूर्ण थरार तिथल्या एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केला आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) धुमाकूळ घालत आहे.

Dangerous Snake Stunt Video:
Viral Video: वंदे भारत बनली 'भाजी मंडई'! 700 रुपयांचे तिकीट 380 मध्ये विकणाऱ्या टीटीईचा 'स्टिंग ऑपरेशन'ने पर्दाफाश; रेल्वेकडून तत्काळ निलंबन

नेटकऱ्यांच्या मजेशीर आणि संतप्त प्रतिक्रिया

हा व्हिडिओ 'एक्स' वर '@gharkekalesh' नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला. अवघ्या काही तासांतच हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. व्हिडिओ पाहून एका युजरने लिहिले की, "कधीकधी निरर्थक मस्ती खूप महाग पडू शकते." दुसऱ्या एका युजरने खोचक टोमणा मारत लिहिले, "हा तर खतरों का खिलाडी बनत होता." तर आणखी एकाने लिहिले, "एका झटक्यातच जिरली."

Dangerous Snake Stunt Video:
Viral Video: 'दोरी ओलांडली अन् भारतात घुसले'; पाकिस्तानी इन्फ्लुएंसरचा अजब दावा, नेटकऱ्यांनी काढली चांगलीच खोड

या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की, कोणत्याही प्राण्यासोबत किंवा सापासारख्या सरपटणाऱ्या जिवासोबत असे स्टंट करणे अत्यंत धोकादायक आहे. अशावेळी स्वतः हिरो बनण्यापेक्षा वनविभाग किंवा सर्पमित्रांना बोलावणेच फायद्याचे ठरते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com