Viral Video: वंदे भारत बनली 'भाजी मंडई'! 700 रुपयांचे तिकीट 380 मध्ये विकणाऱ्या टीटीईचा 'स्टिंग ऑपरेशन'ने पर्दाफाश; रेल्वेकडून तत्काळ निलंबन

Vande Bharat TTE Viral Video: भारतीय रेल्वेची सर्वात प्रीमियम आणि हाय-टेक ट्रेन मानली जाणारी 'वंदे भारत एक्सप्रेस' सध्या एका खळबळजनक प्रकरणामुळे चर्चेत आली आहे.
Vande Bharat TTE Viral Video
Vande Bharat TTE Viral VideoDainik Gomantak
Published on
Updated on

भारतीय रेल्वेची सर्वात प्रीमियम आणि हाय-टेक ट्रेन मानली जाणारी 'वंदे भारत एक्सप्रेस' सध्या एका खळबळजनक प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. या ट्रेनमधील एका टीटीईने (TTE) चक्क प्रवाशासोबत तिकिटाच्या दरावरून एखाद्या भाजी मंडईसारखा घासाघीस केल्याचा प्रकार समोर आला आहे. ७०० रुपयांचे अधिकृत तिकीट केवळ ३८० रुपयांत देण्याचे आमिष दाखवणाऱ्या या टीटीईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, रेल्वे प्रशासनाने या भ्रष्ट अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

प्रवाशानेच केले 'स्टिंग'

हे प्रकरण दानापूर रेल्वे मंडळाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एका प्रवाशाला वंदे भारतमध्ये प्रवास करायचा होता, ज्याचे अधिकृत भाडे ७०० रुपये आहे.

मात्र, कर्तव्यावर असलेल्या टीटीईने प्रवाशाला एक 'गुप्त ऑफर' दिली. "रसीद न घेता फक्त ३८० रुपये द्या, मी सीटची व्यवस्था करतो," असे सांगत टीटीई सौदेबाजी करू लागला. आपण करत असलेले काम चुकीचे आहे, याची कबुलीही तो व्हिडिओमध्ये देताना दिसत आहे. मात्र, समोरचा प्रवासी त्याचे स्टिंग ऑपरेशन करत आहे, याची त्याला पुसटशी कल्पनाही नव्हती.

Vande Bharat TTE Viral Video
Goa Crime: गोवा हादरला! आधी पैशांचं आमिष, मग अत्याचार अन् मारहाण; 60 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचली तक्रार

हा व्हिडिओ 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. अनेकांनी रेल्वेमंत्री आणि दानापूर डीआरएम यांना टॅग करून कारवाईची मागणी केली. रेल्वेनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित टीटीईला तातडीने निलंबित केले आहे.

वंदे भारतसारख्या व्हीआयपी ट्रेनमध्ये जर अशा प्रकारे भ्रष्टाचाराचे जाळे पसरले असेल, तर सामान्य गाड्यांची काय अवस्था असेल, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. हे रॅकेट मोठ्या स्तरावर सुरू आहे का, याचा तपास आता रेल्वे करत आहे.

Vande Bharat TTE Viral Video
Goa Politics: मनोजनंतर अजयकडूनही सोशल मीडियाद्वारे 'बाण'; 'आरजी'त 'उजो'; कार्यकर्त्यांच्‍या ब्रेनवॉशचा आरोप

भ्रष्टाचाराचा 'डिस्काउंट' अन् नियमांचा धाबा

रेल्वेच्या नियमांनुसार, रिकाम्या जागा वेटिंग लिस्ट असलेल्या प्रवाशांना देण्याचा अधिकार टीटीईला असतो, परंतु त्यासाठी अधिकृत रसीद फाडणे बंधनकारक आहे. रसीद न देता पैसे खिशात टाकणे हा थेट भ्रष्टाचार मानला जातो. इंटरनेटवर काही युजर्सनी खोचक टीका करत म्हटले की, "टीटीई साहेब प्रवाशांना डिस्काउंट देत होते, पण रेल्वेला ते सहन झाले नाही." तर बहुतेकांनी त्या सजग प्रवाशाचे कौतुक केले आहे, ज्याने या भ्रष्टाचाराचा पुरावा जगासमोर आणला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com