England Cricketer Death: क्रिकेट विश्वात शोककळा! इंग्लंडच्या 'या' दिग्गज माजी खेळाडूचे निधन

Cricketer Death: इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू रॉबिन स्मिथ यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले. स्मिथने १९८८ ते १९९६ या काळात इंग्लंडसाठी ६२ कसोटी सामने आणि ७१ एकदिवसीय सामने खेळले.
England Cricketer Death
England Cricketer DeathDainik Gomantak
Published on
Updated on

इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू रॉबिन स्मिथ यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी १९८८ ते १९९६ या काळात इंग्लंडसाठी ६२ कसोटी सामने आणि ७१ एकदिवसीय सामने खेळले. १९९२ च्या विश्वचषकात तो उपविजेत्या संघाचा (इंग्लंड) भाग होता. त्यांच्या कुटुंबीयांनी त्याच्या निधनाची पुष्टी केली. या दुःखद बातमीमुळे क्रिकेट जगत शोककळा पसरली आहे.

रॉबिन स्मिथ यांच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी इंग्लंडसाठी ६२ कसोटी सामने खेळले. या काळात त्यांनी ४३.६७ च्या सरासरीने ४,२३६ धावा केल्या, ज्यात नऊ शतकांचा समावेश होता. यातील तीन शतके वेस्ट इंडिजविरुद्ध होती.

त्यांची सर्वोच्च कसोटी धावसंख्या १७५ होती, जी त्याने १९९४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती. स्मिथ यांनी हॅम्पशायरचे प्रतिनिधित्व करताना काउंटी क्रिकेट देखील खेळले. २००४ मध्ये, स्मिथने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

१९९३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मिथ यांनी ऐतिहासिक खेळी केली. त्यांनी एका वनडेत नाबाद १६७ धावा केल्या, जो या फॉरमॅटमध्ये इंग्लंडच्या फलंदाजाने केलेली सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती.

स्मिथ यांचा हा विक्रम २३ वर्षे टिकला. २०१६ मध्ये अॅलेक्स हेल्सने पाकिस्तानविरुद्ध १७१ धावा करून हा विक्रम मोडला. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी ७१ सामन्यांच्या ७० डावात ३९.०१ च्या सरासरीने २४१९ धावा केल्या.

England Cricketer Death
Plantation In Goa: कौतुकास्पद! गोमंतकीयांनी 7 महिन्‍यांत लावली 3.55 लाख रोपटी; ‘एक पेड माँ के नाम’मध्ये उत्स्फूर्त सहभाग

रॉबिन स्मिथ यांच्या कुटुंबाने जारी केलेल्या निवेदनात सोमवारी साउथ पर्थ येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये स्मिथचे निधन झाल्याची पुष्टी करण्यात आली. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) चे अध्यक्ष रिचर्ड थॉम्पसन यांनी स्मिथच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

England Cricketer Death
Goa Politics: काणकोण सभेवरील कारवाईचे तवडकरांनी केले समर्थन; म्हणाले, 'आम्ही राजकारण करत नाही..' VIDEO

हॅम्पशायर क्रिकेट क्लबनेही स्मिथला श्रद्धांजली वाहिली. थॉम्पसन म्हणाले की रॉबिन स्मिथ हा असा खेळाडू होता जो जगातील काही वेगवान गोलंदाजांसोबत बरोबरी राखत होता आणि आव्हानात्मक दृष्टिकोनाने आक्रमक वेगवान गोलंदाजीचा सामना करत होता. त्याने असे केले की इंग्लंडच्या चाहत्यांना खूप अभिमान वाटला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com