
नवी दिल्ली: नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेस खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेसचे ओव्हरसीज प्रमुख सॅम पित्रोदा यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात फिर्यादी आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २५ एप्रिल रोजी ठेवण्यात आली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने सुमन दुबे आणि इतरांचीही नावे आरोपपत्रात समाविष्ट केली आहेत. या प्रकरणी ईडीने यापूर्वी ६४ कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता जप्त केली आहे.
ईडीचे राहुल-सोनिया आणि इतरांविरुद्ध आरोपपत्र
ईडीने राहुल, सोनिया गांधी आणि इतरांविरुद्ध पीएमएलए कायद्याच्या कलम ४४ आणि ४५ अंतर्गत आरोपपत्र दाखल केले असून, आरोपींनी कलम ३ अंतर्गत मनी लाँड्रिंगचा गुन्हा केल्याचा आरोप केला आहे.
पुढील सुनावणीपूर्वी तक्रारीची क्लीन कॉपी आणि ओसीआर (वाचण्यायोग्य) प्रत आणि संबंधित कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्याचे निर्देश ईडीला देण्यात आले होते. सध्या, हे प्रकरण दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाच्या ACJM-03 न्यायालयात सुरू आहे.
नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरण काय आहे?
नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरण इंडियन लिमिटेड, असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) आणि नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र यांच्यातील व्यवहारांशी संबंधित आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षनिधीचा गैरवापर केला आणि एजेएलची मालमत्ता त्यांच्या खासगी नियंत्रित कंपनी 'यंग इंडियन'कडे हस्तांतरित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
वैयक्तिक फायद्यासाठी पक्ष निधीचा बेकायदेशीर वापर केल्याचा ईडीने आरोप केला आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची यंग इंडियनमध्ये ७६ टक्के भागीदारी असल्याचे तपासात आढळून आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.