Charge Sheet Against Rana Ayyub: राणा अय्युब विरोधात 'ईडी'कडून आरोपपत्र दाखल

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाई; चॅरिटीच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचा आरोप
Rana Ayyub ED
Rana Ayyub EDDainik Gomantak
Published on
Updated on

Charge Sheet Against Rana Ayyub: सक्तवसुली संचलनालयाने (ED) मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पत्रकार राणा अय्युब यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. राणा यांनी चॅरिटीच्या नावाखाली लोकांकडून अवैधरित्या पैसे गोळा केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे.

Rana Ayyub ED
Hijab Ban Verdict: हिजाबवर बंदी योग्य की अयोग्य? हे आता सरन्यायाधीश ठरवणार

राणा अय्युब यांनी मदतकार्यासाठी निधई गोळा करण्यासाठी जे अभियान सुरू केले होते, त्याचा उद्देश सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणे हाच असल्याचे ईडीने तपासाअंती म्हटले आहे. 2021 मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी अय्युबविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी त्यांची चौकशी सुरू केली. या प्रकरणी गाझियाबाद येथील एका न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

ईडीने आरोपात म्हटले आहे की, राणा यांनी केट्टो या ऑनलाईन क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्मवर तीन कॅम्पेन सुरू केल्या होत्या. यातून त्यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला होता. या कॅम्पेनद्वारे त्यांनी एप्रिल ते मे २०२० या काळात झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी मदतकार्य राबवले होते. जून ते सप्टेंबर २०२० या काळात त्यांनी आसाम, बिहार आणि महाराष्ट्रात मदत कार्य मोहिम राबवली होती तर मे ते जून २०२१ या काळात कोरोनाने त्रस्त लोकांसाठी मदतीची मोहिम राबवली होती.

Rana Ayyub ED
AAP Leader Gopal Italia: 'आप'चे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

या काळात राणा अय्युब यांना 2.69 कोटी रूपये मिळाले होते. यातील 80.49 लाख रुपए परदेशी चलन होते. त्यानंतर प्राप्तीकर विभागाने फॉरेन कंट्रीब्यूशन रेगुलेशन्स अॅक्ट (FCRA) च्या उल्लंघनप्रकरणी अय्युब यांची चौकशी सुरु केली. त्यानंतर अय्यूब यांनी परदेशातून मिळालेला निधी परत केला. ईडीने म्हटले आहे की, ऑनलाई प्लॅटफॉर्मवरून जो निधी गोळा केला गेला होता, तो राणा यांचे वडिल आणि बहिणीच्या खात्यात हे पैसे हस्तांतरित केले गेले होते.

तर यातील 50 लाख रुपए अय्युब यांनी स्वतःच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवले. तर आणखी 50 लाख दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केले. मदत कार्यात केवळ 29 लाख रुपए वापरले गेले. राणा यांनी खोटी बिले जमा केली, सरकारच्या परवानगीशिवाय परदेशातून निधी घेतला, असेही ईडीने म्हटले आहे.

दरम्यान, राणा अयूब यांचे 2002 च्या गुजरात दंगलीवर ‘गुजरात फाइल्‍स- अॅनाटॉमी ऑफ अ कवरअप’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध आहे. गुजरात दंगलीत अनेक अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचे त्यांनी पुस्तकात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com