AAP Leader Gopal Italia: आम आदमी पक्षाचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांना दिल्ली पोलिसांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) कार्यालयातून ताब्यात घेतले. पोलिस इटालिया यांना जीपमध्ये बसवून घेऊन गेली. तत्पुर्वी आपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
आयोगाने गुरूवारी इटालिया यांना एका व्हिडिओ प्रकरणात बोलावले होते. या व्हिडिओमध्ये इटालिया यांनी कथितरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे सांगितले जात होते.
आम आदमी पक्षाची भाजपवर टीका
गोपाल इटालिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आम आदमी पक्षाने भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. आपने ट्विटमध्ये म्हटले आहे की, गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजपने गोपाळ इटालिया यांना अटक केली होती. आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विटमधून इटालिया यांची अटक हा गुजरातमधील सर्व पटेल कुटूंबाचा अपमान केला आहे. त्यामुळे पटेल समाजात धुसफुस आहे. संपुर्ण भाजप इटालिया यांच्या मागे लागल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महिला आयोग काय म्हणतो?
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा म्हणाल्या की, पोलिसांनीत्यांना अटक करावी, कारण ते कायदा आणि सुव्यवस्था प्रभावित करू शकतात. इटालिया यांचे कार्यकर्ते कार्यालयात जबरदस्ती घुसले. मला कार्यालयातून बाहेर पडता आले नाही, त्यामुळे एका बैठकीला पोहचण्यास मला उशीर झाला. जर शंभर-दीडशे लोक येऊन मला धमकावणार असतील तर ते कसले नेते आहेत? त्यांना केवळ काही प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी होती. त्यांना असत्याचा आधार घ्यावा लागला, तसेच वकिलांची फळी का उभी करावी लागली?
रेखा शर्मा यांनी धमकावले : इटालिया
दरम्यान, इटालिया यांनीही रेखा शर्मा यांनी त्यांना धमकावल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आयोगाच्या अध्यक्षांनी मला तुरूंगात टाकण्याची धमकी दिली आहे. मोदी सरकार पटेल समाजाला तुरूंगाशिवाय काय देऊ शकते? पाटीदार समाजाचा भाजप द्वेष करतो. मी सरदार पटेलांचा वंशज आहे. तुमच्या तुरूंगांना घाबरत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.