Sonia Gandhi
Sonia GandhiDainik Gomantak

वाद थांबता थांबेना, 'Sonia Gandhi सोबत गैरवर्तन करणाऱ्यांवर कारवाई करा'

President Remark Row: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी करण्यात आलेल्या असभ्य वर्तनाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

President Remark Row: काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी करण्यात आलेल्या असभ्य वर्तनाचा मुद्दा उपस्थित केला आहे. अधीर रंजन चौधरी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून भाजप खासदारांनी सोनिया गांधींसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात यावे अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, काँग्रेस खासदारांनी पत्रात म्हटले आहे की, 'सभागृह तहकूब झाल्यानंतर सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि इतर नेते बाहेर जात असताना भाजप खासदारांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. सोनिया गांधी या संदर्भात रमा देवी यांच्याशी बोलत असताना अनेक सदस्यांनी तिथे येऊन काँग्रेस अध्यक्षांना घेराव घातला. यावेळी त्यांनी सोनिया गांधी यांच्याशी गैरवर्तन केले. गैरवर्तन करणाऱ्या खासदारांना निलंबित करण्याची आमची मागणी आहे.'

Sonia Gandhi
'मोदी-योगींच्या नादी लागल तर तुमचं लग्न होणार नाही': जयंत चौधरी

अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यावर गदारोळ

आज लोकसभेच्या कामकाजादरम्यान अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन बराच गदारोळ झाला. आदल्या दिवशी अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी 'राष्ट्रपत्नी' हा शब्द वापरला होता. त्यामुळे आज सभागृहात काँग्रेस आणि भाजप खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

दुसरीकडे, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले की, "सोनिया गांधींनी देशाच्या राष्ट्रपतींचा अपमान मान्य केला आहे. सोनिया गांधी आणि काँग्रेस आदिवासी, दलित आणि महिलाविरोधी आहेत. त्यांनी माफी मागितली पाहिजे."

Sonia Gandhi
Bengal SSC Scam: ममता बॅनर्जींची मोठी कारवाई, पार्थ चॅटर्जींची मंत्रीपदावरून हकालपट्टी

काँग्रेसने भाजप खासदारांवर आरोप केले

यानंतर काँग्रेस अध्यक्षा भाजप खासदारांशी चर्चा करण्यासाठी गेल्या. यावेळी स्मृती इराणी यांच्या सांगण्यावरुन भाजप (BJP) खासदारांनी महिलांच्या स्वाभिमानाला आणि प्रतिष्ठेला कलंकित केल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्यांनी सोनिया गांधींशी अपमानास्पद वागणूक दिली.

Sonia Gandhi
SSC Scam: पार्थ चॅटर्जींची हकालपट्टी केल्यानंतर ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री म्हणाल्या, 'सोनिया गांधी संतापल्या होत्या'

या प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) म्हणाल्या, "जेव्हा सोनिया गांधी आमच्या ज्येष्ठ नेत्या रमा देवी यांच्याकडे काय घडत आहे, हे जाणून घेण्यासाठी आल्या तेव्हा आमचे काही खासदार तिथे पोहोचले. सोनिया गांधी यांनी त्यांना सांगितले की, मी तुमच्याशी बोलत नाहीये. सोनिया गांधी यावेळी संतापल्या होत्या.'' यावर काँग्रेस नेते गौरव गोगोई म्हणाले की, 'सोनिया गांधी बेधडक आहेत. म्हणूनच त्या महिला खासदारांकडे गेल्या होत्या. परंतु भाजप खासदारांनी त्यांच्याबरोबर असभ्य वर्तन केले.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com