SSC Scam: पार्थ चॅटर्जींची हकालपट्टी केल्यानंतर ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया

WB SSC Scam: पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्यात अडकलेल्या पार्थ चॅटर्जींच्या अडचणी वाढत आहेत.
 Mamata Banerjee
Mamata BanerjeeDainik Gomantak
Published on
Updated on

WB SSC Scam: पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात अडकलेल्या पार्थ चॅटर्जींच्या अडचणी वाढत आहेत. तृणमूल काँग्रेस (TMC) प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना मंत्रिमंडळातून हटवले. पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) म्हणाल्या की, 'एका महिलेकडून पैसे वसूल केले गेले आहेत. माझा पक्ष अत्यंत कडक शिस्तीचा आहे. त्यामुळे मी पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली.' पार्थ चॅटर्जी सध्या अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात असून त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या काही ठिकाणावर ईडीने (ED) छापा टाकला आहे.

 Mamata Banerjee
Bengal SSC Scam: ममता बॅनर्जींची मोठी कारवाई, पार्थ चॅटर्जींची मंत्रीपदावरून हकालपट्टी

ममता बॅनर्जींवर निशाणा साधला

या घोटाळ्यात पार्थ चॅटर्जींना अटक झाल्यापासून आतापर्यंत ममता बॅनर्जींनी याप्रकरणी मौन बाळगले होते. आतापर्यंत टीएमसीच्या कोणत्याही मोठ्या नेत्याने या प्रकरणी उघडपणे बोलणे टाळले होते. या प्रकरणी ईडीकडून अनेक खुलासे होत असतानाच ममता बॅनर्जींनी पार्थ चॅटर्जी यांच्यावर ही कारवाई केली.

 Mamata Banerjee
Bengal SSC Scam: अर्पिता मुखर्जींच्या आणखी एका ठिकाणावर ईडीची धाड !

कुणाल घोष यांनी पक्षातून हकालपट्टीची मागणी लावून धरली

पार्थ चॅटर्जी यांच्यावर कारवाई न केल्याबद्दल भाजप सातत्याने टीएमसीला लक्ष्य करत होते. त्याचवेळी, वाढता दबाव पाहून टीएमसीमधूनच पार्थ चॅटर्जी यांच्याविरोधात आवाज उठू लागला. शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीत अटक करण्यात आलेले पश्चिम बंगालचे (West Bengal) मंत्री पार्थ चॅटर्जी यांची पक्षातून तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) प्रवक्ते कुणाल घोष यांनी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com