'मोदी-योगींच्या नादी लागल तर तुमचं लग्न होणार नाही': जयंत चौधरी

आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
Jayant Chaudhary
Jayant ChaudharyDainik Gomantak
Published on
Updated on

अग्निपथ योजनेच्या विरोधात उत्तर प्रदेशातील श्यामलीमध्ये युवा पंचायतीला संबोधित करताना आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर जोरदार निशाणा साधला. आरएलडी अध्यक्षांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पीएम मोदी यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य केले. ते म्हणाले - 'त्यांनी स्वतः लग्न केले नाही. त्यामुळे ते आपलं ही होऊ देणार नाही.' इतकंच नाही तर जयंत चौधरी यांनी पीएम मोदी आणि सीएम मोदी यांची तुलना बिजारशी केली. ते पुढे म्हणाले, ते बिजार आहेत किंवा ज्यांना जंगलात काही टेन्शन नाही. परंतु तुम्हा-आम्हाला कुटुंब आहे.'

दरम्यान, युवा पंचायतीला संबोधित करताना जयंत चौधरी (Jayant Chaudhary) म्हणाले की, 'तुम्ही जेव्हा लग्नासाठी (Marriage) मुलगी मागायला जाल, तेव्हा तुम्ही सैन्यात असाल. मग मुलगी कोण देणार? मुली म्हणतील आता चार वर्षांनी नोकरी लागली की पुन्हा ये.' जयंत पुढे म्हणाले की, 'तुम्ही बॅचलरच राहाल.'

Jayant Chaudhary
IAF Agniveer Recruitment 2022: अग्निवीर भरतीसाठी 6 दिवसांत 2 लाखांहून अधिक अर्ज

तसेच, शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देत जयंत चौधरी म्हणाले की, 'हे कागदी सिंह आहेत. शेतकऱ्यांनी 13 महिने रस्त्यावर मोदी सरकारविरुध्द लढा दिला. अखेर मोदी सरकारला कृषी कायदा रद्द करावा लागला. कृषी कायदा आम्ही पुन्हा लागू होऊ देणार नाही. जेव्हा संसदेचे (Parliament) कामकाज होत नव्हते, तेव्हा राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर सरकारने मागल्या दाराने कृषी कायदा आणला. मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे सरकारला नमते घ्यावे लागले.'

Jayant Chaudhary
Udaipur: 'या प्रकरणी कायदा कारवाई करेल', कन्हैया लालच्या निर्घृण हत्येवर ममता बॅनर्जींचं वक्तव्य

चौधरी पुढे म्हणाले की, 'हे कागदी सिंह आहेत. तरुणांनी ठरवलं तर त्यांचा निभाव लागणार नाही. आता तरुणांनी आंदोलन करुन अग्निपथसारखी योजना मागे घेण्यासाठी मोदी सरकारवर (Modi Government) दबाव आणावा.' श्यामली, बागपत, सहारनपूर आणि मुझफ्फरनगर सारख्या अनेक भागात आरएलडी अग्निपथ योजनेच्या विरोधात युवा पंचायत आयोजित करत आहे, ज्यामध्ये मोठ्या संख्येने तरुण जमा होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com