Big success for UP ATS, 2 Pakistani spies arrested:
उत्तर प्रदेश एटीएसने दोन पाकिस्तानी हेरांना अटक केली आहे. दोघांवर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे.
माहितीनुसार, यूपी एटीएसला अशी माहिती मिळाली होती की, काही लोकांना संशयास्पद स्त्रोतांकडून पैसे मिळत आहेत ज्याचा वापर दहशतवादी कारवाया आणि हेरगिरीसाठी केला जात आहे.
यानंतर यूपी एटीएसने याप्रकरणी दोघांना अटक केली. एका आरोपीचे नाव रियाजुद्दीन असून दुसऱ्याचे नाव अमृत गिल उर्फ अमृतपाल सिंग आहे.
रियाजुद्दीन हा गाझियाबादचा रहिवासी आहे तर दुसरा आरोपी अमृत पाल सिंग हा पंजाबमधील भटिंडा येथील रहिवासी आहे.
प्राथमिक माहितीनुसार, अमृत गिल उर्फ अमृतपाल सिंग हा पाकिस्तानी आयएसआय एजंट्सच्या संपर्कात होता आणि भारतीय लष्कराशी संबंधित संवेदनशील आणि प्रतिबंधित माहिती आयएसआयला पाठवत असे.
या कामाच्या बदल्यात आयएसआयच्या पाकिस्तानी हस्तकांनी रियाजुद्दीन आणि इझारुल यांच्या मदतीने अमृत गिलला पैसे दिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.