Watch Video: इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने महाराष्ट्रात पिकवले 3 लाख रुपये किलोने विकले जाणारे केशर

Keshar Production In Maharashtra: आतापर्यंत फक्त काश्मीर हे केशर लागवडीसाठी ओळखले जात होते. मात्र, त्याची लागवड आता महाराष्ट्रासारख्या उष्ण हवामानाच्या भागातही केली जात आहे.
Keshar Production In Maharashtra nandurbar
Keshar Production In Maharashtra nandurbarDainik Gomantak
Published on
Updated on

An engineering student grows saffron in Maharashtra that sells for Rs 1000 per kg:

आतापर्यंत फक्त काश्मीर हे केशर लागवडीसाठी ओळखले जात होते. मात्र, त्याची लागवड आता महाराष्ट्रासारख्या उष्ण हवामानाच्या भागातही केली जात आहे.

महाराष्ट्रातील नंदुरबारसारख्या उष्ण हवामानाच्या परिसरात कंप्युटर इंजिनीअरींग करणाऱ्या विद्यार्थ्याने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केशर पिकवण्यात यश मिळवले आहे.

सध्या बाजारात एक ग्रॅम केशरची किंमत 300 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे एक किलो केशरमागे 3 ते 5 लाख रुपये उत्पन्न मिळवणे शक्य आहे.

तंत्रज्ञानाची मदत

महाराष्ट्रातील नंदुरबार येथे राहणारा हर्ष मनीष पाटील हा अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे. कॉम्प्युटर सायन्स शिकत आहे. त्याने वडिलांच्या पारंपारिक शेतीशिवाय पैसे कमवण्याचा पर्याय म्हणून शेती विकसित करण्याचा विचार केला. त्याने हे आव्हान स्वीकारले आणि त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली.

केशर लावण्यापूर्वी त्यांनी इंटरनेटवर याबद्दल बरीच माहिती शोधली. तेव्हा काश्मीरसारख्या ठिकाणांशिवाय इतरत्रही केशर पिकवता येते, हे त्याच्या लक्षात आले.

Keshar Production In Maharashtra nandurbar
Kalpana Saroj: छळ, उपेक्षा अन् दारिद्र्याच्या छाताडावर उभारत वाघिणीने निर्माण केले हजारो कोटींचे साम्राज्य

यशस्वी लागवड

नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यातील खेड दिगर या छोट्याशा गावात राहणारा हर्ष पाटील या तरुणाने शिक्षणाचा मौल्यवान संपत्ती म्हणून उपयोग करून नवीन तंत्रज्ञान शिकून केशराची लागवड करण्यात यश मिळवले आहे.

15 x 15 खोलीत केशर उत्पादन

केशर उत्पादनासाठी आवश्यक असलेले थंड वातावरण 15 बाय 15 खोलीत तरुणाने तयार केले. हर्ष पाटील यांनी दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत केशर उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला आहे.

खेड दिगर हे गाव शहादा तालुक्यात वसले असून 700 ते 800 लोकसंख्या असलेल्या या छोट्या गावात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हर्ष पाटील यांनी ही किमया केली आहे.

Keshar Production In Maharashtra nandurbar
Success Story Of OYO: छोट्याशा खेड्यातील तरुण असा झाला 16 हजार कोटींचा मालक, गोष्ट देशातील सर्वात यशस्वी स्टार्टअपची

पहिल्या टप्प्यात तीनशे ग्रॅम केशर उत्पादन

हा सर्व प्रयोग करण्यासाठी हर्षने सुमारे पाच लाख रुपये खर्च केले. एक केशर बियाणे पेरले तर त्यापासून तीन ते चार केशर बिया तयार होतात. एक कंद साधारण आठ ते दहा वर्षांपर्यंत निर्माण होऊ शकतो.

सुमारे अडीच ते तीन महिन्यांपासून हा प्रयोग यशस्वीपणे सुरू असून, सध्या बियाणे फुटून केशर फुलले आहे. पहिल्या टप्प्यात तीनशे ग्रॅम केशराचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. बाजारात एक ग्रॅम केशरची किंमत 300 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com