निवडणुकीच्या पराभवानंतर नेत्यांच्या गटबाजीमुळे काँग्रेस फुटीच्या दिशेने

पक्षातील नाराज नेत्यांचा G-23 हा गट पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, त्याची व्याप्ती वाढवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
Congress
CongressDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यांमध्ये काँग्रेसच्या (Congress) सततच्या पराभवानंतर पक्षात एकच खळबळ उडाली आहे. पक्षातील नाराज नेत्यांचा G-23 हा गट पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, त्याची व्याप्ती वाढवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. पक्ष नेतृत्वाविरोधात कोणाला काही तक्रार असेल तर त्यासाठी जी-23 व्यासपीठ म्हणून काम करत आहे. पाच राज्यांतील पराभवानंतर आता या गटाने पुन्हा एकदा बैठक बोलावली आहे, ज्यामध्ये काँग्रेस नेतृत्वावरती पुन्हा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. (After election defeat Congress is falling apart due to factionalism of the leaders)

Congress
आप कडून हरभजन सिंग राज्यसभेवर?

गांधी कुटुंबाला दिला सल्ला बैठकीनंतर, गांधी कुटुंबाचे नाव न घेता, एक सामूहिक निवेदन जारी करण्यात आले होते, ज्यात काँग्रेसचे भवितव्य केवळ सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा आदर्श स्वीकारण्यावरती अवलंबून आहे. गुलाम नबी आझाद गुरुवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचीही भेट घेऊ शकतात, अशी चर्चा रंगत आहे. काँग्रेसच्या असंतुष्ट नेत्यांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात असे म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election 2022) लाजिरवाणे निकाल आणि काँग्रेसमधून वारंवार होणारे नेते व कार्यकर्त्यांना सोडचिठ्ठी देण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. सामूहिक आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा आदर्श स्वीकारण्यावरच काँग्रेसची पुढची दिशा ठरते आहे.

भाजपला (BJP) विरोध करण्यासाठी काँग्रेसला बळकटी देण्याची गरज असल्याचे काही नाराज नेत्यांनी सांगितले. 2024 साठी विश्वासार्ह पर्याय शोधण्यासाठी काँग्रेसने समविचारी पक्षांशी चर्चा करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. पुढील वाटचालीची घोषणा लवकरच करण्यात येईल असेही निवेदनाच्या शेवटी सांगण्यात आले आहे. असंतुष्ट काँग्रेस नेत्यांनी अधिकृत संयुक्त निवेदन जारी करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसमधील लढत आणखी चिघळणार असल्याचे स्पष्ट आहे. काँग्रेस फुटीच्या दिशेने वाटचाल करत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Congress
गोव्यात रॅम्पेज क्षेपणास्त्राची होणार चाचणी

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते भुपिंदरसिंग हुड्डा (Bhupinder Singh Hooda) यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला काँग्रेसचे हे बडे नेते उपस्थित होते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पंजाबच्या माजी मुख्यमंत्री राजिंदर कौर भट्टल, लोकसभेचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद. खासदार मनीष तिवारी, शशी थरूर, परिणीत कौर, राज्यसभा खासदार आनंद शर्मा, कपिल सिब्बल, विवेक तन्खा, अखिलेश प्रसाद सिंह उपस्थित होते. याशिवाय मणिशंकर अय्यर, राज बब्बर, संदीप दीक्षित, केरळचे पीजे कुरियन, हरियाणाचे कुलदीप शर्मा, आंध्र प्रदेशचे एमए खान, गुजरातचे शंकर सिंह वाघेला हे दिग्गज नेते सहभागी झाले होते. G-23 चे 14 जुने नेते उपस्थित होते, तर नवीन चार नेत्यांमध्ये मणिशंकर अय्यर हे देखील सर्वात महत्त्वाचे होते. एकूणच काय तर, G-23 ची संख्या पूर्वीपेक्षा कमी असली तरी त्यांची व्याप्ती विस्तृत आहे.

याआधी बैठक कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी होणार होती, मात्र सिब्बल यांनी गांधी घराण्याविरोधात केलेल्या उघड वक्तृत्वानंतर जागा बदलण्यात आली आहे. सिब्बल यांनी सध्यातरी मीडियाशी बोलू नये, असे काही नाराज नेत्यांचे मत आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सिब्बल यांनी गांधी परिवाराच्या जागी वरच्या नेतृत्वातून दुसरा नेता आणावा, अशीही मागणी केली होती. तेव्हापासून सिब्बल हे काँग्रेसच्या अनेक नेत्यांच्या निशाण्यावरती आहेत. दुसरीकडे चांदणी चौक जिल्हा काँग्रेस कमिटीने कपिल सिब्बल यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा ठराव करून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे.

Congress
होळीच्या दिवशी दिला जाणार होता मुलीचा बळी, पोलिसांना बसला धक्का

विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर चर्चा करण्यासाठी झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत भविष्याची दिशा ठरवण्यासाठी काँग्रेसने एप्रिल महिन्यात चिंतन शिबिर आयोजित करण्याची घोषणा केली. मात्र पक्षातील असंतुष्ट नेत्यांच्या नाराजीने चिंतनापूर्वीच गांधी घराण्याची चिंता देखील वाढली आहे. दुसरीकडे, पंजाब, यूपी, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरच्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे स्वीकारल्यानंतर सोनिया गांधी यांनी अजय माकन, जितेंद्र सिंग, अविनाश पांडे, रजनी पाटील, जयराम रमेश यांना या राज्यांमध्ये संघटनात्मक बदलासाठी सूचना गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com