गोव्यात रॅम्पेज क्षेपणास्त्राची होणार चाचणी

मिसाईल टार्गेटच्या बांधणीसाठी चाचणी निविदाही जारी
india to test rampage missile in goa
india to test rampage missile in goaDainik Gomantak

इस्रायलकडून घेतलेल्या रॅम्पेज मिसायलची गोव्यात चाचणी होणार आहे. संरक्षण दलाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात ह्या मिसाईल चाचणी होणार आहे. भारतीय नौदलाच्या सुखोई-30 किंवा मीग-29 ह्या फायटर जेटवर हे मिसाईल इंटिग्रेट करून त्याची चाचणी घेण्यात येणार आहे.

ह्या मिसाईलच्या चाचणीसाठी भारतीय नौदलाने (Indian Navy) तयारी सुरू केली आहे. मिसाईल टार्गेटच्या बांधणीसाठी चाचणी निविदाही जारी करण्यात आली आहे. बिल्गिंड नंबर 18 असे ह्या टार्गेटला नाव देण्यात आले आहे. लवकरच ह्या टार्गेटची बांधणी होणार आहे. ह्या टार्गेटवर हे बांधण्यासाठी फायर करून सगळ्या अंगानी चाचणी होणार आहे.

india to test rampage missile in goa
मुलाखतीत बिट्टा कराटेची 20 काश्मिरी पंडितांची हत्या केल्याची कबुली

पाकिस्तानमध्ये (Pakistan) झालेल्या बालाकोट एअर स्ट्रायक प्रमाणे एखादे ऑपरेशन करण्यासाठी ह्या मिसाईलचा वापर होऊ शकलो. आपल्या हवाई हद्दित राहून दुश्मन देशाच्या आतमध्ये शत्रू राष्ट्राला न कळता डिप एअर स्ट्रायक करण्यासाठी अशा प्रकारच्या मिसाईलचा (missile) वापर होतो. लाँग रेंज एअर टू स्ट्रायक मोडमध्ये ह्या मिसाईलचा वापर होतो.

जिपियस गायडन्स सह एँटी जॅमिंगची क्षमता असल्या कारणाने हे मिसाईल अतिशय धोकादायक ठरते. फायर एँड फॉर्गेट मोडमध्ये ह्या मिसाईलचा वापर केला जाऊ शकतो. 2021च्या एअर शो दरम्यान इस्रायलकडून हे मिसाईल डिसप्ले करण्यात आले होते. त्यावेळेस भारत हे मिसाईल विकत घेऊ शकतो असा कयास होता. पण त्यानंतर ह्या मिसाईल बद्दल कसलीच माहिती समोर आली नव्हती. मध्यंतरीच्या काळात भारताने इस्रायलकडून हे मिसाईल घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com