Video: जीवन मृत्यूच्या लढ्यात आशेचा किरण, उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या मजुरांचा पहिला व्हिडिओ समोर

Uttarkashi tunnel: सिल्क्यरा बोगद्यात १२ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता हा अपघात झाला होता. बोगद्याच्या प्रवेश बिंदूच्या 200 मीटरच्या आत 60 मीटर माती खचली. त्यानंतर 41 मजूर आत अडकले आहेत.
Laborers trapped in Uttarkashi tunnel.
Laborers trapped in Uttarkashi tunnel.Dainik Gomantak
Published on
Updated on

After 10 days, the first video of the laborers trapped in the tunnel in Uttarkashi has surfaced:

उत्तरकाशीमध्ये बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, 10 दिवसांनंतर बोगद्यात अडकलेल्या मजुरांचा पहिलाच व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हिडिओमध्ये कामगार बोगद्यात एकत्र उभे राहून एकमेकांशी बोलत असल्याचे दिसत आहे.

आता पाईपद्वारे कामगारांपर्यंत अन्न पोहोचवण्यात आले आहे. याशिवाय कामगारांना मोबाइल फोन आणि चार्जिंगची सुविधाही देण्यात आले आहे.

९ दिवसांनी मजुरांना मिळाले अन्न

अपघातानंतर 9 व्या दिवशी बचाव पथकाला काल मोठे यश मिळाले. अन्न पुरवठा करण्यासाठीचा पाइप कामगारांपर्यंत पोहोचला असून, त्याद्वारे आता बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत अन्न पोहोचवले जात आहे.

कामगारांना पाइपद्वारे खिचडी, संत्री आणि पाणी पोहचवण्यात आले आहे. हे अन्नपदार्थ बाटल्यांमध्ये भरुन त्यांच्यापर्यंत पोहोचवले आहे.

6 इंच रुंद पाइप सुमारे 53 मीटर लांब आहे ज्याद्वारे अन्न वितरित केले गेले. एवढेच नाही तर बचाव कार्यात डीआरडीओचे रोबोट मदत करत आहेत.

बोगद्यात अडकलेल्या मजुरांना मोबाइल फोन आणि पॉवर सप्लाय चार्जर देण्याचेही प्रयत्नही यशस्वी झाले आहेत. याशिवाय बोगद्याच्या आत वायफाय सुविधा देण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

Laborers trapped in Uttarkashi tunnel.
खलिस्तानी दहशतवादी पन्नूवर NIA ची मोठी कारवाई; एअर इंडियाचे विमान उडवण्याची दिली होती धमकी!

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

कामगारांच्या सुटकेसाठी तज्ज्ञांचे पथक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. DRDO ची रोबोटिक्स मशीन टीम सध्या सिल्क्यरा बोगद्यात आहे.

डीआरडीओचे दोन ७० किलोचे रोबोट येथे पोहोचले आहेत, तर नव्याने ड्रोनही उडवण्यात येणार आहेत. दोन डीआरडीओ रोबोट बोगद्याच्या आत आणण्यात आले आहेत, त्यापैकी एक 50 किलो आणि दुसरा 20 किलो आहे.

पहिल्या दिवशी ड्रोन चांगली कामगिरी करू शकला नाही पण आज पुन्हा एकदा त्याचा वापर करण्यात येणार आहे.

Laborers trapped in Uttarkashi tunnel.
Viral Video: क्रूरता! कोंबडीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये 4 मुलांनी फोडले फटाके, वेदनादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

सिल्क्यरा बोगद्यात १२ नोव्हेंबरला पहाटे ४ वाजता हा अपघात झाला होता. बोगद्याच्या प्रवेश बिंदूच्या 200 मीटरच्या आत 60 मीटर माती खचली. त्यानंतर 41 मजूर आत अडकले.

16 नोव्हेंबर रोजी बचाव कार्यादरम्यान, बोगद्यातून आणखी दगड पडले, ज्यामुळे मलबा एकूण 70 मीटरपर्यंत पसरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com