Sesa Mining: सेसा कामगारांसाठी वेतन करार करा

Sesa Mining: संघटनेची मागणी: 32 महिन्यांपासून चालढकल
Goa Sesa Workers
Goa Sesa WorkersDainik Gomantak
Published on
Updated on

Sesa Mining: साखळी गेल्या 32 महिन्यांपासून कामगारांसाठीचा वेतन करार प्रलंबित असून वारंवार मागणी करूनही कंपनी चालढकल करीत आहे. तो करार लवकरात लवकर करावा, अशी मागणी सेसा कामगार संघटनेच्या कामगारांनी वार्षिक बैठकीत केली.

Goa Sesa Workers
Bhandari Community Goa: कोणता झेंडा घेऊ हाती? भंडारी समाज

कामगार संघटनेचे अध्यक्ष देवानंद परब यांनीही या मागणीवर जोर देताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही कामगारांनी कंपनीला कामगारांनी साथ दिल्याचे नमूद केले. कंपनीनेही हा वेतन करार लवकर करून कामगारांना दिलासा द्यावा. त्यासाठी आपणही प्रयत्नशील आहे, असे आश्वासन दिले. सेसा कामगार संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा साखळी रवींद्र भवन येथे झाली.

एकसंध राहा!

सरकारने लवकरच डम्पिंग धोरण अमलात आणल्यास पुढील पंधरा वीस दिवसांत खाण व्यवसाय पूर्वीसारखा सुरू होणार असल्याने कामगारांना चांगले दिवस येतील, असा विश्वास देवानंद परब यांनी व्यक्त केला. त्यासाठी सर्वांनी एकसंध राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Goa Sesa Workers
Noise Pollution In Goa: अत्याधुनिक तंत्रज्ञानाची आता प्रदूषणावर नजर!

‘सेसा फॉर ग्रीनर गुड’

वेदांता सेसा गोवाने ‘सेसा फॉर ग्रीनर गुड’ या मोहिमेअंतर्गत आपल्या अनेक पर्यावरणीय नवकल्पनांवर प्रकाश टाकला आहे, ज्यात शाश्वत वनीकरण तंत्र, जल सकारात्मकतेची वचनबद्धता आणि खाण क्षेत्राचे पद्धतशीर पुनर्वसन यांचा समावेश आहे.

वेदांता सेसा गोवाने मे २०२२ मध्ये ‘सेसा फॉर ग्रीनर गुड’ ही मोहीम सुरू केली. पद्धतशीर खाण पुनर्वसन उपाययोजनांसह त्यांनी त्यांच्या पर्यावरण संवर्धनासाठीच्या प्रयत्नांवरही प्रकाश टाकला.

कंपनीने कार्यान्वित केलेल्या ग्रीन मॉडेलने शाश्वत खाणींसाठी नवीन मानके तयार केली आहेत. गोव्यातील साखळी येथील खाणीत वेदांता सेसा गोवाने एका खाणीचे जैवविविधतेचे या समृद्ध आश्रयस्थानात रूपांतर केले आहे,असेही यावेळी वेदांताकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com