खलिस्तानी दहशतवादी पन्नूवर NIA ची मोठी कारवाई; एअर इंडियाचे विमान उडवण्याची दिली होती धमकी!

Gurpatwant Pannun: राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूविरोधात गुन्हा दाखल केला.
Gurpatwant Singh Pannu
Gurpatwant Singh PannuDainik Gomantak
Published on
Updated on

NIA Books Gurpatwant Pannun Over His Video Threatening Air India: राष्ट्रीय तपास यंत्रणेने सोमवारी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूविरोधात गुन्हा दाखल केला. एअर इंडियाचे विमान उडवून देण्याची धमकी दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पन्नू हा खलिस्तानी संघटना शिख फॉर जस्टिसचा संस्थापक आहे.

19 नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना बॉम्बने उडवण्याची धमकी त्याने दिली होती. एजन्सीने जारी केलेल्या निवेदनानुसार, पन्नूविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120 बी, 153 ए आणि 506 आणि कलम 10, 13, 16, 17, 18, 18 बी आणि बेकायदेशीर क्रियाकलापांच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा व्हिडीओ 4 नोव्हेंबरला रिलीज झाला होता

दरम्यान, खलिस्तानी दहशतवादी पन्नूने 4 नोव्हेंबरला व्हिडिओ जारी केला होता. त्याने शीखांना एअर इंडियाच्या विमानात बसू नये, अशी धमकी दिली होती. असे करणाऱ्यांना आपला जीव गमवावा लागेल, अशी धमकी पन्नूने दिली होती.

एवढेच नाही तर त्याने एअर इंडियाला (Air India) जगभरातील उड्डाणे बंद करण्याची धमकीही दिली होती. पन्नूच्या या धमक्यांनंतर सुरक्षेसह मोठ्या प्रमाणावर तपास सुरु करण्यात आला होता. कॅनडा आणि भारतामध्ये तसेच एअर इंडियाच्या उड्डाणे चालणाऱ्या सर्व देशांमध्ये सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले होते.

19 नोव्हेंबरला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात यावे, अशी धमकीही पन्नूने भारत सरकारला दिली होती. नवी दिल्ली इथे असलेले हे विमानतळ जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे.

Gurpatwant Singh Pannu
Jammu and Kashmir मध्ये NIA ची मोठी कारवाई, पाकिस्तानी नागरिकासह दोन आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल!

यापूर्वीही धमक्या दिल्या आहेत

एनआयएने म्हटले आहे की, पन्नू पंजाबच्या (Punjab) मुद्द्यांवर, विशेषत: देशातील शीख आणि इतर समुदायांमध्ये वैर वाढेल अशी वक्तव्ये करत आहे. पन्नूने यापूर्वीही धमक्या दिल्या आहेत. यामध्ये त्याने भारतातील रेल्वे तसेच औष्णिक वीज प्रकल्पांसह अत्यावश्यक वाहतूक नेटवर्क यंत्रणांना धोका पोहोचवू अशी धमकी दिली होती. गृह मंत्रालयाने 10 जुलै रोजी SFJ वर बंदी घातली होती. 1 जुलै 2020 रोजी केंद्राने पन्नूला दहशतवादी म्हणून सूचीबद्ध केले होते.

Gurpatwant Singh Pannu
देशातील 10 ठिकाणी NIA ची छापेमारी; मानवी तस्करी मोड्यूलचा पर्दाफाश, 4 प्रकरणात 44 आरोपींना अटक

दोन वर्षांपासून एनआयच्या रडारवर

दुसरीकडे, पन्नू 2019 पासून एनआयएच्या रडारवर आहे. त्यानंतर दहशतवादविरोधी संस्थेने त्याच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखल केला होता. या वर्षी सप्टेंबरमध्ये एनआयएने अमृतसर (पंजाब) आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशातील सूचीबद्ध दहशतवाद्याचे घर आणि जमीन जप्त केली होती. एनआयएच्या विशेष न्यायालयाने 3 फेब्रुवारी 2021 रोजी पन्नूनविरुद्ध अटकेचे अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. गेल्या वर्षी 29 नोव्हेंबरला त्याचे नाव 'घोषित गुन्हेगार' म्हणून जाहीर करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com