Viral Video: क्रूरता! कोंबडीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये 4 मुलांनी फोडले फटाके, वेदनादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

Assam News: मानवी क्रौर्याची परिसीमा ओलांडणाऱ्या बातम्या, व्हिडिओ आणि फोटो समोर येत राहतात.
Viral Video
Viral VideoDainik Gomantak

Assam News: मानवी क्रौर्याची परिसीमा ओलांडणाऱ्या बातम्या, व्हिडिओ आणि फोटो समोर येत राहतात. प्राण्यांवरील क्रूरतेचे असे व्हिडीओ वेळोवेळी येत असतात, जे पाहून तुमचा विश्वास बसणार नाही की माणूस इतका क्रूर कसा काय वागू शकतो.

स्वतःच्या आनंदासाठी तो कधी कधी अशा गोष्टी करु लागतो की जेव्हा खरोखरच माणूस एवढ्या पातळीपर्यंत विचार करु शकतो यावर विश्वास बसत नाही.

प्राण्यांवर बलात्कार, जाळणे, वाहनांना बांधून लांबपर्यंत ओढत नेणे यासारख्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील, पण आसामच्या नागावमधून एक व्हिडिओ समोर आला आहे जो खूपच किळसवाणा आहे. या व्हिडिओमध्ये 4 मुले कोंबडीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फटाके लावून ते फोडताना दिसत आहेत.

दरम्यान, या चार मुलांनी कोंबडीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फटाके फोडलेच पण त्याचा व्हिडिओही बनवला. एका व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्याचा व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मुले कोंबडीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फटाके ठेवून माचिसच्या काडीने फोडताना दिसत आहेत.

फटाका फुटला की सगळे हसतात. हसण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. फटाका फोडल्यानंतर कोंबडी गंभीर जखमी झाली, तिचा प्रायव्हेट पार्ट पूर्णपणे जळाला. यामुळे तिचा मृत्यू झाला.

Viral Video
Viral Video: बैलगाडीत बसून निषेध आंदोलन; अद्रमुकच्या नेत्याचा व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने काय म्हटले?

X वर व्हिडिओ शेअर करताना त्या व्यक्तीने लिहिले की, ''एक दुर्दैवी घटना घडली, जिथे आसामच्या राहा गावात एक कोंबडी क्रूर कृत्याची शिकार झाली. 4 मुलांनी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फटाका फोडला. कोंबडीचा वेदनादायक मृत्यू झाला.''

Viral Video
Viral Video: ड्युटीवर असताना दारु पिणं पोलिसाला पडलं महागात, डीजीपींनी दिले निलंबनाचे आदेश

एनजीओने पोलिसांकडे कारवाईची मागणी केली

दुसरीकडे, व्हिडीओ समोर आल्यानंतर एनजीओ पीएफएने पोलिसांना (Police) याप्रकरणी कारवाई करण्यास सांगितले आहे. एनजीओने एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, या निष्पाप जीवाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण एकत्र येऊ या. आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलीस काय कारवाई करतात हे पाहायचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com