Teesta Setalwad यांना अद्याप दिलासा नाही, जामीन अर्जावरील निर्णय ढकलला पुढे

2002 Gujarat Riots Case News: सेटलवाड आणि श्रीकुमार यांनी स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत.
Teesta Setalvad
Teesta Setalvad Dainik Gomantak
Published on
Updated on

2002 Gujarat Riots Case: 2002 च्या गुजरात दंगली प्रकरणी निरपराधांना अडकवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप तिस्ता सेटलवाड आणि माजी डीजीपी आरबी श्रीकुमार यांच्यावर आहे. आज त्यांच्या जामीन अर्जावरील आदेश अहमदाबाद न्यायालयाने 28 जुलैपर्यंत पुढे ढकलला आहे. सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी अहमदाबाद येथील सियाल न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सेटलवाड आणि श्रीकुमार यांनी स्वतःवरील आरोप फेटाळून लावले आहेत.

चार्ज काय आहे?

तीस्ता आणि श्रीकुमार यांच्याशिवाय माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट हेही या प्रकरणात आरोपी आहेत. हे तिन्ही आरोपी तत्कालीन नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकार अस्थिर करण्याचा कट रचत होते, असा दावा एसआयटीने केला आहे. पीडितांच्या मदतीसाठी देण्यात आलेल्या निधीचा गैरवापर करुन राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. हे सर्व काँग्रेस (Congress) नेते अहमद पटेल यांच्या सांगण्यावरुन करण्यात आले.

Teesta Setalvad
कोण आहेत तिस्ता सेटलवाड?, पद्मश्री परत घेण्याची केली जायेत मागणी

दुसरीकडे, तीस्ता सेटलवाड (Teesta Setalvad) यांचा जन्म महाराष्ट्रात (Maharashtra) झाला आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली. तीस्ता यांना 2007 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्या सिटीझन्स फॉर जस्टिस अँड पीस नावाची एनजीओ चालवतात. पत्रकारिता करण्यासाठी त्यांनी कायद्याचे शिक्षण अर्धवट सोडले होते. त्यांचा विवाह पत्रकार जावेद आनंद यांच्याशी झाला होता. सेटलवाड यांचे आजोबा एम सी सेटलवाड हे देशाचे पहिले अॅटर्नी जनरल होते. त्यांचे वडीलही वकील होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com