कोण आहेत तिस्ता सेटलवाड?, पद्मश्री परत घेण्याची केली जायेत मागणी

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
Teesta Setalvad
Teesta Setalvad Dainik Gomantak
Published on
Updated on

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. खरे तर गृहमंत्र्यांनी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्याकडून पद्मश्री परत घेण्याची मागणी केली आहे. ज्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयावर टिप्पणी करणे, ज्यांचे वर्तन संशयास्पद आहे, त्यांच्याकडून पद्मश्री काढून घेण्यात यावे, असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे. तिस्ता सेटलवाड यांना काँग्रेसच्या काळात तुष्टीकरणामुळे पुरस्कार देण्यात आल्याचा आरोप नरोत्तम मिश्रा यांनी केला आहे. (Who Is Teesta Setalvad Narottam Mishra Demand Take Back Padma Shree Award Pm Modi Gujrat Riot 2002)

कोण आहेत तीस्ता सेटलवाड

तीस्ता सेटलवाड (Teesta Setalvad) या मुंबईत (Mumbai) राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. तिस्ता सेटलवाड यांना शनिवारी गुजरात एसआयटीच्या पथकाने ताब्यात घेतले. 2002 च्या गुजरात दंगलीत निरपराध लोकांना अडकवण्यासाठी गुन्हेगारी कट, फसवणूक आणि न्यायालयात खोटे पुरावे सादर केल्याचा तिस्ता यांच्यावर आरोप आहे.

Teesta Setalvad
Gujarat Riots: तिस्ता सेटलवाड प्रकरणाची SIT करणार चौकशी

दुसरीकडे, तिस्ता सेटलवाड या व्यवसायाने पत्रकार असून त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 2002 च्या गुजरात दंगलीनंतर तीस्ता सेटलवाड यांनी सिटीझन्स फॉर जस्टिस अँड पीस ही एनजीओ (NGO) सुरु केली. दंगलग्रस्तांना कायदेशीर आणि आर्थिक मदत देण्यासाठी या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करण्यात आली होती.

तसेच, गुजरात दंगल पीडित झाकिया जाफरी यांच्यासह तिस्ता सेटलवाड आणि त्यांच्या एनजीओने पंतप्रधान मोदी आणि इतरांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, शुक्रवारीच सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) ही याचिका फेटाळून लावली. गुजरात दंगलीदरम्यान झाकिया जाफरी यांचे पती आणि काँग्रेस नेते एहसान जाफरी यांची हत्या करण्यात आली होती. गुजरात दंगलग्रस्तांच्या लढ्यात तिस्ता सेटलवाड एक प्रमुख चेहरा आहेत. 2007 मध्ये तीस्ता यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि गुजरात दंगलीच्या चौकशीची मागणी केली. सेटलवाड यांनी गुजरात दंगलीप्रकरणी पंतप्रधान मोदींविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणीही केली होती.

Teesta Setalvad
मुस्लिम तरुणीशी लग्न केल्याप्रकरणी हिंदू तरुणाची भर रस्त्यात हत्या

तिस्ता सेटलवाड या वादांशी संबंधित आहेत

2006 मध्ये तीस्ता सेटलवाड यांच्यावर अनेक आरोप झाले होते. गुजरात (Gujarat) दंगलीतील मृतदेह पुरण्यात आलेल्या ठिकाणी धार्मिक भावना दुखावणे, बनावट पुरावे गोळा करणे आणि उत्खनन करणे असे आरोपही त्यांच्यावर करण्यात आले होते. तिस्ता सेटलवाड यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com