Mulayam Singh's Village: मेट्रोसिटीला लाजवेल असे आहे मुलायमसिंह यादव यांचे गाव...

सैफेईमध्ये मेडिकल विद्यापीठ, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, महामार्ग, रेल्वे, हवाईपट्टी, शाळा, कॉलेज अशा सर्व सुविधा
Mulayam Singh Yadav
Mulayam Singh YadavDainik Gomantak
Published on
Updated on

Mulayam Singh Yadav's Village: भारतातील एखाद्या गावामध्ये रूग्णालय, वैद्यकीय विद्यापीठ, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शाळा, महाविद्यालये, शॉपिंग कॉम्प्लेक्स, विमातळासाठी हवाईपट्टी अशा सुविधा असतील, असे सांगितले तर कदातिच कुणाला पटणार नाही. पण, एका गावात तरी या सुविधा आहेत. ते गाव म्हणजे मुलायमसिंह यादव यांचे गाव सैफेई.

Mulayam Singh Yadav
Justice D. Y. Chandrachud: वडिलांनंतर आता मुलगाही होणार भारताचा सरन्यायाधीश

उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात हे गाव आहे. समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर हे गाव शोकसागरात बुडाले आहे. याच गावात 22 नोव्हेंबर 1939 रोजी त्यांचा जन्म झाला होता. मैनपुरी या लोकसभा मतदारसंघात हे गाव आहे. या मतदारसंघातून मुलायमसिंह अनेकदा निवडून आले. सैफेईचेच लोक मुलायमसिंह यांना 'नेताजी'म्हणून बोलावत असत.

लोकसंख्या केवळ 7000

मुलायसिंहांचे सैफेई गाव नेहमीच चर्चेत राहिले. सैफेई महोत्सवात चित्रपट सृष्टीतील बडे स्टार्स येत असतात. एखाद्या मेट्रोसिटीमध्ये असतात अशा बहुतांश सुविधा या गावामध्ये आहेत. पुर्वी हे गाव शेतीवर अवलंबून होते. येथील बहुतांश जमिन पडीक होती. पण केवळ 7 हजार लोकसंख्येचे हे गाव आता एज्युकेशन, हेल्थ आणि स्पोर्टस हब म्हणून ओळखले जात आहे.

गावात वैद्यकीय विद्यापीठ

येथील रस्ते रूंद आहेत. 24 तास वीज असते. पाण्याची व्यवस्था उत्तम आहे. येथे अपार्टमेंट्स आहेत आणि मोठे व्हिलाही आहेत. या गावात गेल्यावर गुरूग्राम किंवा नोएडाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. सैफेईपासून जवळच उत्तर प्रदेशची मेडिकल सायन्स विद्यापीठ आहे. येथे 200 डॉक्टर आणि 300 हून अधिक नर्सिंग स्टाफ आहे. सैफईमध्ये 82.44 टक्के साक्षरता आहे.

Mulayam Singh Yadav
Charge sheet Against A Raja: बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी 'राजा' यांच्याविरोधात आरोपपत्र

महामार्ग, रेल्वेस्थानक आणि हवाईपट्टीही

येथे एसटी स्टँड आहे. हे गाव चौपदरी महामार्गाला लागून आहे. गावाच्या जवळूनच आग्रा-लखनौ एक्सप्रेसवेदेखील गेला आहे. इटावा-मैनपुरी रेल्वेमार्गावरील रेल्वेस्थानकही येथे आहे. एव्हढेच काय, पण विमान उतरण्यासाठी येथे हवाईपट्टीदेखील आहे. 2015 मध्ये येथे भारतीय हवाई दलाने मिराज-2000 हे विमान उतरवले होते. 2018 मध्ये हवाईदलाने येथे हवाई कसरतीही केल्या होत्या.

स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स

येथे दोन शाळा असून त्यापैकी एक सीबीएसई तर दुसरी युपी बोर्डची आहे. यातील सीबीएसई शाळेस मुलायमसिंहांचे वडिल सुघरसिंह यांचे नाव आहे तर दुसऱ्या शाळेस अमिताभ बच्चन यांचे नाव दिले आहे. या शाळेत डिजिटल क्लासरूम आणि सायन्स ल्रॅब आहेत. या गावाच्या बाहेर 65 एकरामध्ये एक कॉलेज आहे. येथे बायोटेक्नोलॉजी, बिझनेस एडमिनिस्ट्रेशन, कॉमर्स, सायन्स, आर्ट्स हे कोर्सेस आहेत. 2015 मध्ये येथे फार्मसी कॉलेजही झाले. येथे मेजर ध्यानचंद स्पोर्ट्स कॉलेजही आहे. येथे विविध खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. या कॉलेजमध्ये क्रिकेट स्टेडियम आणि अॅथलेटिक्स स्टेडियमही आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com