Job Scam: रशियात नोकरीची इच्छा पडली महागात, दलालाने भारतीय तरुणांना युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी जुंपलं सैन्यात

Russia Ukraine War: हे चौघे 2023 च्या मध्यात चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईला गेले. यावेळी जॉब रिक्रूटरने त्यांच्याकडून प्रत्येकी 3.5 लाख रुपये घेतले होते.
A job recruiter has forced three Indian people to fight for the Russian army in Ukraine
A job recruiter has forced three Indian people to fight for the Russian army in Ukraine

A job recruiter has forced three people from Karnataka and one from Telangana to fight for the Russian army in Ukraine by promising them jobs in Russia:

एका जॉब रिक्रूटरने रशियामध्ये सुरक्षा कर्मचारी म्हणून नोकरी देण्याचे आश्वासन देत कर्नाटकातील तीन आणि तेलंगणातील एका व्यक्तीला युक्रेनमध्ये रशियन सैन्यासाठी लढण्यास कथितरित्या भाग पाडले आहे.

हे चौघेजण सध्या रशियातील युद्धग्रस्त युक्रेन सीमेजवळ अडकले आहेत. एका व्हिडिओ मेसेजमध्ये, तेलंगणातील मोहम्मद सुफियान या पीडित व्यक्तीने मदतीसाठी आवाहन करत त्यांच्या अडचणी जगासमोर मांडल्या आहेत.

या चौघांनी गेल्या वर्षी दुबईतील एका जॉब रिक्रूटरशी संपर्क साधला होता. या रिक्रूटरने पीडित तरुणांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवले.

हे चौघे 2023 च्या मध्यात चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दुबईला गेले. यावेळी जॉब रिक्रूटरने त्यांच्याकडून प्रत्येकी 3.5 लाख रुपये घेतले होते. त्यानंतर ते गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात परतले होते.

A job recruiter has forced three Indian people to fight for the Russian army in Ukraine
Viral Video: "आम्ही तुम्हाला आमचे तुकडे पाडू देणार नाही," ब्रिटीश संसदेत कडाडली काश्मीरी कन्या

पुढच्याच महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२३ मध्ये चौघे रशियाला गेले. रशियात गेल्यानंतर काही दिवसांनी, सुफियानच्या कुटुंबाला एक व्हिडिओ मेसेज आला, ज्यामध्ये तो केंद्र सरकारकडे त्याच्यासह चार तरुणांना पुरुषांना मदत करण्याची विनंती करताना दिसत आहे.

कारण नोकरी देतो असे सांगून त्यांना प्रत्यक्षेपणे रशिया-युक्रेन युद्धात रशियाकडून लढण्यास भाग पाडले जात होते.

टाईम्स ऑफ इंडियानुसार, सुफियानच्या कुटुंबाला हा व्हिडिओ मेसेज युक्रेन-सीमेवरून पाठवण्यात आला होता जिथे हे तरूण लष्कराच्या गणवेशात दिसत आहेत. यामध्ये ते म्हणत होते, "कृपया आम्हाला वाचवा. आम्ही हाय-टेक फसवणुकीचे बळी आहोत."

A job recruiter has forced three Indian people to fight for the Russian army in Ukraine
IM-1 Mission: ऐतिहासिक! खासगी कंपनीचे चंद्रावर पाऊल, पहिले व्यावसायिक लँडिंग दणक्यात

दरम्यान या पीडित तरुणांच्या कुटुंबियांना भीती आहे की, त्यांना रशियन-सरकारच्या अनुदानीत खाजगी लष्करी कंपनी वॅगनर ग्रुपमध्ये सक्तीने भरती करण्यात आले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीत असे नमूद करण्यात आले आहे की, या चार तरूणांव्यतिरिक्त किमान 60 भारतीय नागरिक आहेत.

या अडकलेल्या लोकांना रशियामधून परत आणण्यासाठी भारत सरकार कोणते कायदेशीर मार्ग अवलंबणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com