Yamuna Expressway Accident
Yamuna Expressway AccidentDainik Gomantak

यमुना एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात, महाराष्ट्रातील 5 जणांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर

अपघातात ठार झालेले चार जण बारामती येथील असून एक महिला कर्नाटकातील बेळगाव येथील रहिवासी आहे
Published on

Yamuna Expressway Accident: उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. यमुना एक्स्प्रेस वेवर हा भिषण अपघात आज सकाळी झाला, ज्यामध्ये 2 जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील लोक आग्राहून नोएडाला जात होते. जेवर टोल प्लाझासमोर 40 किमीच्या मैलाच्या माइलस्टोनजवळ हा अपघात झाला. पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागून येणारी बोलेरो कार ट्रकला धडकली.

Yamuna Expressway Accident
अपघातानंतर तत्काळ प्रथमोपचार महत्त्वाचे: डॉ. कौशिक सरकार

कारमध्ये 7 जण होते, त्यापैकी 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले असून, त्यांना जेवर येथील कैलास रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.

अपघातात ठार झालेले चार जण महाराष्ट्रातील पुण्यातील बारामती येथील असून एक महिला कर्नाटकातील बेळगाव येथील रहिवासी आहे. अपघातात चंद्रकांत नारायण बुराडे 68, स्वर्णा चंद्रकांत बुराडे 59 (महिला), मालन विश्वनाथ कुंभार 68 (महिला), रंजना भारत पवार 60 (महिला), नुवांजन मुजावर 53 (महिला) यांचा समावेश आहे. यामध्ये नुवंजन हिरेकुडी हा बेळगाव कर्नाटक येथील रहिवासी होता.

Yamuna Expressway Accident
धारबांदोड्यात दुचाकीचा भीषण अपघात, तिघे जखमी

त्याचवेळी जखमींमध्ये महाराष्ट्रातील सातारा येथील रहिवासी नारायण रामचंद्र कोळेकर वय 40 आणि सुनीता राजू गुस्ते, बेळगाव, कर्नाटक येथील रहिवासी आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रस्ते अपघातात 5 जणांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या. अपघातात जखमी झालेल्यांना योग्य उपचार देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com